घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : उद्यापासून तीन दिवस पुण्यातील दुकाने बंद

करोना व्हायरस : उद्यापासून तीन दिवस पुण्यातील दुकाने बंद

Subscribe

पुण्यात उद्यापासून तीन दिवस दुकाने बंद राहणार आहेत, पुणे व्यापारी महासंघांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात उद्यापासून तीन दिवस दुकाने बंद राहणार आहेत, पुणे व्यापारी महासंघांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील घाऊक आणि रिटेल दुकानदार दुकाने बंद ठेवणार आहेत. पुण्यामध्ये काही वेळापूर्वीच पुणे व्यापारी महासंघाची बैठक झाली. आणि हा निर्णय स्वयंस्फुर्तीने घेण्यात आला आहे. करोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होवू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे व्यापारी व दुकानदार यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

पुणे व्यापारी महासंघांअंतर्गत जेवढी घाऊक व रिटेल दुकाने असतील तरी पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. ही साथ पुर्णपणे नियंत्रणात यावी, यासाठीचा हा प्रयत्न आहे. कारण करोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आपण आता आहोत. करोनावर नियंत्रण आणू शकलो नाही. तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण आहे. पुणे व्यापारी महासंघ ही पुण्यातील मोठी संघटना आहे. या संघटनेमध्ये जवळपास ७० ते ८० दुकानदार संघटने अंतर्गत काम करतात. त्यामुळे हा अतिशय मोठा निर्णय म्हणावा लागेल.

करोनामुळे पुणेकर घाबरले आहेत. आणि याचा फैलाव जास्त होऊ नये. म्हणून तुलसीबाग तीन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. पण एकाने बंद पाळून काही होणार नाही. सगळ्यांनी मिळून बंद पाळला, तर त्याचा उपयोग होईल. तसेच भविष्यकाळात पुणेकरांना कोणता त्रास होणार नाही. यासाठी उद्यापासून तीन दिवस घाऊक आणि रिटेल व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय सर्वांच्या मताने घेण्यात आला आहे. मात्र, मेडिकल, दुध, भाजी आणि किराणा ही दुकाने सुरू राहतील.
– सुर्यकांत पाठक, उपाध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -