घरताज्या घडामोडीकरोनाचा केंद्रबिंदू चीनकडून युरोपात - WHO, इटलीत २४ तासात २५० जण दगावले

करोनाचा केंद्रबिंदू चीनकडून युरोपात – WHO, इटलीत २४ तासात २५० जण दगावले

Subscribe

इटलीमध्ये करोना व्हायरसमुळे दगावणाऱ्या रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ दिसून आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल २५० रूग्ण दगावल्याची माहिती इटालियन सिव्हिल प्रोट्क्शन डिपार्टमेंटने जारी केली आहे. त्यामुळे आता करोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता १२६६ इतकी झाली आहे. इटलीमध्ये एकुण करोनाच्या रूग्णांची वाढ १७ हजार ६६० इतकी नोंदविण्यात आली आहे. त्याआधी ही संख्या १५,११३ इतकी होती, पण फक्त २४ तासांमध्ये ही वाढ होत आता संख्या १७ टक्क्यांनी एकाच दिवसात वाढली आहे. इटली सरकारने खबरदारी म्हणून आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये दुकाने, बार तसेच मॉल्स अशा सगळ्या सार्वजनिक ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आता करोनाचा नवा केंद्रबिंदू म्हणून युरोपची घोषणा केली आहे. करोनाचा व्हायरस झपाट्याने याठिकाणी वाढत असल्याने डब्ल्यूएचओकडून हा एलर्ट जारी करण्यात आला आहे.

चीनमध्ये मृत्यूचा आकडा ३१८९ वर

- Advertisement -

चीनमध्ये शुक्रवारी आणखी ११ करोनाच्या प्रकरणांची नोंद झाली. याआधी हा आकडा ८ पर्यंत खाली आला होता. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने याआधी करोनाग्रस्त नव्या रूग्णांचा आकडा सिंगल डिजिट झाला असल्याचे जाहीर केले होते. आतापर्यंत एकट्या चीनमध्ये ८० हजार ८२४ इतका आकडा करोनाग्रस्तांचा नोंदविण्यात आला आहे. तर आतापर्यंत ३१८९ इतक्या रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी १३ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला. त्यामध्ये चीनच्या वुहान शहरातील १० जणांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -