घरताज्या घडामोडीकोरोनाचे Globucel Injection बनावट विक्री करण्याचा डाव उघड

कोरोनाचे Globucel Injection बनावट विक्री करण्याचा डाव उघड

Subscribe

कोरोना महामारीच्या काळात अनेक औषधांचा भ्रष्टाचार केल्याचे आपण पाहिले आहे. रेडमेडिसीवरच्या इंजेक्शनपासून ते म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनपर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये काहींना काहीतरी भ्रष्टाचार होत आला आहे. आता कोरोनाचे बनावट ग्लोबुसेल इंजेक्शन हे काही राज्यामध्ये विक्री करत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार जळगावमधील मेडिकलवर धाड टाकली. यावेळेस या मेडिलने संशयित बनावट औषधाचा २२० वायल्स इतका साठा चंडीगड येथून विना खरेदी बील प्राप्त केला होता. त्याची विक्री औषध विक्रीचा परवाना नसलेल्या पंजाब येथील मेडिकल श्रीक्रिधा इंटरनॅशनल हेल्थकेअर येथे करण्यात येत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी दोन्ही मेडिकलच्या मालकांविरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन, महाराज्य मुंबई येथील गुप्तवार्ता विभागास आणि त्यानंतर मेडिकल इंटास फार्मासुटीकल प्रा. लि.या उत्पादकाने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगे Globucel Injection,10% (Intravenous Human Normal Immunoglobulin for Intravenous Use IP 10%) Batch No.97130072, M/s IntasPharmceuticals, Ahemdabad या औषधासारखे बनावट औषध देशातील काही राज्यात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झालेली होती. त्या माहितीच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधील घाटे कॉम्प्लेक्स येथील मेडिकल जोगेश्वरी फार्मा या घाऊक औषध विक्रेत्याकडे गुप्तवार्ता विभाग आणि जळगाव कार्यालयाच्या पथकाने ४ डिसेंबरला चौकशीसाठी धाड टाकली. त्यावेळेस पेढीने संशयित बनावट औषधाचा २२० वायल्स इतका साठा चंडीगड येथून विना खरेदी बील प्राप्त केला होता आणि त्याची विक्री औषध विक्रीचा परवाना नसलेल्या पंजाब येथील मेडिकल श्रीक्रिधा इंटरनँशनल हेल्थकेअर या पेढीस करण्यात आल्याचे आढळून आले.

- Advertisement -

याप्रकरणी जळगावमधील मेडिकल जोगेश्वरी फार्मा या पेढीने खरेदी बिलाशिवाय संशयित बनावट Globucel Injection 10%ची खरेदी करून त्याची विक्री औषध विक्रीचा परवाना नसलेल्या पेढीस केली असल्याने चाळीसगाव पेढीचे मालक जितेंद्र प्रभाकर खोडके आणि मेडिकल श्रीक्रिधा इंटरनॅशनल हेल्थकेअरचे मालक सुनील ढाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भा.दं.वि.च्या विविध कलमाखाली चाळीसगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा क्र. ४४६/२०२१ दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सर्व हॉस्पिटल/औषध विक्रेते यांना अन्न व औषध प्रशासनातर्फे सूचित करण्यात येते की, हे औषध अशा प्रकारची जीवनाश्यक औषधे वापर व विक्री करण्यापूर्वी ते योग्य मार्गाद्वारे प्राप्त झाले आहे की नाही त्याची खात्री करावी. तसेच काही शंका असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित जिल्हा कार्यालय किंवा टोल फ्री क्र. १८००२२२३६५ वर संपर्क करू शकता.

- Advertisement -

हेही वाचा – लसीकरण टार्गेटमध्ये १ दिवसाच्या उशिरासाठीही फासावर लटकवणार; जिल्ह्याधिकाऱ्यांनीच दिली धमकी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -