घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात २३ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण

Maharashtra Corona Update: राज्यात २३ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण

Subscribe

दिवसभरात बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या ९,१३८ इतकी होती.

मागील काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात २३ हजार १७९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८४ रूग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या ९,१३८ इतकी होती. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९१.२६ टक्के इतके आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७८,३५,४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,७०,५०७ (१३.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६२० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ६ हजार ७३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारकडून पुन्हा विविध निर्बंध घालण्यात येत आहेत. अनेक शहारांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला असून लसीकरणाचा वेग आता आणखी वाढवणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. मुंबईमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहावयास मिळत आहेत. मुंबईमध्ये मागील २४ तासांत २ हजार ३९९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,४९,९४७ इतकी झाली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत ११,५५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -