घरमहाराष्ट्रमुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्या झाली तिप्पट; राज्यात एकाचा मृत्यू

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्या झाली तिप्पट; राज्यात एकाचा मृत्यू

Subscribe

मुंबई: गेल्या २४ तासात मुंबई व राज्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या तिप्पट झाली आहे. सोमवारी कोरोना बाधितांची संख्या मुंबईत ९५ होती ती २४२ झाली आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या ३२८ होती ती ९१९ वर गेली आहे. तर, मंगळवारी राज्यात कोरोनाचा आणखीन एक बळी गेला आहे.

सध्या मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्ण संख्येतही वाढ होत आहे. मुंबई महापालिका व राज्य शासनानेही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता कडक उपाययोजना हाती घेतली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात मास्कची सक्ती करण्यात आली आहे. मुंबईतही पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, पालिका, खासगी रुग्णालयात कर्मचारी, डॉक्टर, नर्स आदिना मास्कची सक्ती केली आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासात मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या ९५ वरून २४२ वर तर राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ३२८ वरून थेट ९१९ वर गेली आहे. या आकडेवारीवरून मुंबईसह राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने आता पालिका व खासगी आरोग्य यंत्रणा अधिक अलर्ट झाल्या आहेत.

अकोला महापालिका हद्दीत कोरोनाचा एक बळी गेला आहे. तसेच, राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ५१ हजार १७६ वर गेली आहे. तर, आतापर्यंत कोरोना बाधित मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ४६१ वर पोहोचली आहे. राज्यात मंगळवारी ७१० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ७९ लाख ९७ हजार ८४० रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या ४,८७५ सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

मुंबईत मंगळवारी २४२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित एकूण रुग्णांची संख्या ११ लाख ५९ हजार २२५ वर पोहोचली आहे. तर २१८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत ११ लाख ३७ हजार ९९७ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या विविध रुग्णालयात कोरोनाचे १,४७८ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -