Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कोरोना वाढतोय; योग्य त्या ठिकाणी मास्क वापरा; आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोना वाढतोय; योग्य त्या ठिकाणी मास्क वापरा; आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

Subscribe

मुंबईः महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य त्या ठिकाणी मास्क वापरावा. योग्य ते अंतर ठेवावे, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी गुरुवारी केले. कोरोना व अन्य आजारांबाबत विधानसभेत माहिती देताना आरोग्यमंत्री सावंत यांनी नागरिकांना हे आवाहन केले.

सध्या सणांचे दिवस आहेत. जुलुस, यात्रा निघतील. परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे पर्यटनही वाढले आहे व वाढणार आहे. परिणामी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी. कोरोना वाढतो आहे. पण धोका नाही. तरीही योग्य त्या ठिकाणी मास्कचा वापर नागरिकांनी करायला हवा. अंतर ठेवायला हवे, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

- Advertisement -

पुढे आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, आजारी असल्यास नागरिकांनाी थेट केमिस्टमध्ये जाऊन औषध घेऊ नये. डॉक्टारांच्या सल्लयानेच औषधे घ्यावीत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर वाढतो आहे. मुबई, ठाणे, पुणे, संभाजी नगर, अहमद नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

कोरोना व अन्य आजारांबाबत भूमिका मांडताना मंत्री तानाजी सावंत यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, विविध आजारांचा वाढता धोका वाढतोय. त्यामुळे सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे विरोधी पक्षाचे म्हणणे होते. त्यानुसार मी निवदेन करत आहे. कोरोनाचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासानानेही नियम तयार केले आहेत.

- Advertisement -

एच३एन२, एच२एन२ यासह कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली. संबंधित अधिकाऱ्यांसोबतही आढावा बैठक घेण्यात आली आहे. धोकादायक व्यक्तिंनी काय काळजी घ्यावी याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवक, ज्येष्ठ नागरिक व आरोग्याचा धोका असलेल्या व्यक्तिंना एन३एन२ साठीची लस मोफत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाढत्या आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

 

- Advertisment -