घरताज्या घडामोडीCorona: नागपूरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह १९ अधिकारी कोरोनाबाधित

Corona: नागपूरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह १९ अधिकारी कोरोनाबाधित

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीवाची पर्वा न करताना अहोरात्र काम करत आहेत. या भयाण परिस्थितीत सर्वांचे रक्षण करणारे पोलीस सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान, नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त IPS निलेश भरणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कर्तव्य बजावत असताना १९ अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच वरिष्ठ निरिक्षक संतोष खांडेकर, वजीर शेख यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

आयुक्त कार्यालयात येणाऱ्यांना बंदी

सध्या नागपूरकरांचा कोरोनाशी लढा सुरु झाला असून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस आयुक्त कार्यालयात भेट देणाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. सध्या पोलीस आयुक्त कार्यालयाचे निर्जंतूकीकरण सुरु केले आहे.

- Advertisement -

तर आपल्या बेधडक भूमिका आणि निर्णयांसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतः यासंबंधीची माहिती देणारे ट्विट केले. त्यांनी म्हटले आहे की, ‘मी घरातूनच काम करणार आहे. तसेच गेल्या १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी सुद्धा कोरोनाची चाचणी करून घ्यावी’, अशी विनंती त्यांनी केली आहे.

नागपूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २२ हजार २२५ वर

- Advertisement -

नागपुरमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २२ हजार २२५ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात ८१४ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यासोबत जिल्ह्यात एकूण १३ हजार ६८ रुग्ण बरे झालेले आहेत.


हेही वाचा – ‘कोल्हापूरचा अपमान सहन करणार नाही, एशियन पेंटने ‘ती’ जाहिरात मागे घ्यावी’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -