घरCORONA UPDATECorona Live Update: बापरे! जगभरात कोरोनाने ८ लाखाचा आकडा केला पार

Corona Live Update: बापरे! जगभरात कोरोनाने ८ लाखाचा आकडा केला पार

Subscribe

11.50 PM – कोरोना व्हायरसचा कहर जगभरात सुरुच आहे. आतापर्यंत जगातल्या ८ लाख लोकांना कोरोना विषाणूने आपल्या कह्यात घेतले आहे. तर ४० हजार रुग्णांचा आतापर्यंत यामुळे मृत्यू झाला आहे.


8.40 PM – महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी पाच रुग्ण अत्यवस्थ असून त्यांना ICU मध्ये हलविण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत दहा रुग्णांचे निधन झाले आहे.

- Advertisement -

पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी

7.50 PM – पालघरच्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयात दाखल असलेल्या 51 वर्षीय रुग्णाचा आज संध्याकाळी पाचच्या सुमारास मृत्यू झाला. सफाळे जवळील उसरणी गावचा रहिवाशी असलेल्या मृत रुग्णाला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी कस्तुरबा रुग्णालयातुन त्याचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला होता. पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला हलवण्यात येणार होते. पण, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
सदर इसम काही दिवस सफाळे येथे आपल्या नातलगाकडे राहिला होता.त्यामुळे प्रशासनाने सफाळे परिसरात मनाई आदेश जारी करून लोकांची ये- जा बंद केली आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून सर्व वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घातली आहे.

- Advertisement -

 


३० एप्रिलपर्यंत राजभवनात आता ‘नो एंट्री’

5.50 PM – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात येणाऱ्या लोकांच्या भेटी ३० एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता महिनाभर राजभवनात येऊन कुणालाही राज्यपालांची भेट घेता येणार नाही. ज्यांनी भेटीचे आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, असे ट्विट राजभवनाच्या हँडलवरून करण्यात आले आहे.

 


वसई-विरार नंतर आता नालासोपाऱ्यातही कोरोनाचा रुग्ण

5.30 PM – गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आता नालासोपाऱ्यातही कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. नालासोपाराच्या निळेमोरे या गावात राहणारा ५५ वर्षीय हा रुग्ण सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार घेत आहे. हा रुग्ण जे.जे. रुग्णालयातच कामाला असून कोरोनाचे रुग्ण ज्या विभागात उपचार घेत होते, त्या विभागात या व्यक्तीचा वावर होता.



4.13 PM – 
जामखेड शहरात थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या तिघा स्थानिक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. सोमवारी प्रलंबित असलेले अहवाल आज मंगळवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर आणखी तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकीरी राहुल द्विवेदी यांनी दिली. यामुळे नगरमधील संख्या आता चारवरुन सातवर गेली आहे. जामखेडमध्ये ही बातमी धडकताच मोठी खळबळ उडाली आहे.



3.18 PM –
राज्यावरच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या चार-पाच दिवसांत दूध संकलन सुरु होईल.

CoronaVirus: दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!


12.45 PM – राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक घडी नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि ‘क’ श्रेणीपर्यंतचे कर्मचारी यांच्या वेतनामध्ये २५ टक्क्यांपासून ६० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

CoronaEffect:मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात!


11.30 AM – राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली. कालच्या २२५वरून आता राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या २३२वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईत ४, नवी मुंबईत २ आणि पुण्यात एका रुग्णाची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून लोकांना घरीच थांबून सहकार्य करण्याचं वारंवार आवाहन करण्यात येत आहे. त्यासोबत मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा देखील ९८वर पोहोचला आहे.


11.10 AM – जळगावमध्ये कोरोना संशयिताचा मृत्यू झाला आहे. त्याच्या स्त्रावाचे नमुने अद्याप चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, त्याचे निष्कर्श येण्याआधीच या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून त्याच्यावर जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, तर महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या ४३ वर जाईल.


10.24 AM – नगरमध्ये कोरोनाचं सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या आरोग्यसेविकांना धक्काबुक्की करण्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरच्या मुकुंदनगर परिसरात घडला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरच्या मुकुंदनगर परिसरातच दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. या पार्श्वभूमीवर या भागामध्ये या आरोग्यसेविका सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या.


10.03 AM – केरळमध्ये गेल्या २४ तासांत सापडले ३२ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण. महाराष्ट्रापेक्षा जास्त म्हणजे २३४ रुग्ण केरळमध्ये कोरोनाने बाधित. या ३२पैकी १७ रुग्णांना परदेश प्रवासाची पार्श्वभूमी आहे. तर उरलेल्या १५ जणांना कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे.


9.28 AM – महाराष्ट्रात कोरोनाचे ५ नवीन रुग्ण. त्यापैकी १ मुंबईत, २ पुण्यात तर २ बुलढाण्यात सापडले. राज्यातल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २२५वर!


7.59 AM – कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिलला एप्रिल फूल करणारे मेसेज पाठवले, तर कारवाई केली जाईल असं पत्रक पोलिसांनी काढलं आहे. असे मेसेज करून संभ्रम न वाढवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


7.45 AM – जगभरात कोरोनाचा हाहाकार आज देखील सुरूच आहे. ३१ मार्च रोजी सकाळची आकडेवारी कोरोनाचा विळखा आख्ख्या जगावर किती घट्ट झाला आहे, याचंच द्योतक देणारी ठरली आहे. विशेषत: भारतात आता कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे आपण कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजच्या उंबरठ्यावर उभे असण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या स्टेजमध्ये कम्युनिटी स्प्रेड मोठ्या प्रमाणावर होऊ लागतो. तो टाळण्यासाठीच सगळ्यांनी घरातच राहण्याचं आवाहन सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. भारतात आत्तापर्यंत १ हजार ३४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा ४३ पर्यंत पोहोचला आहे.

जगभरातली कोरोनाची आकडेवारी…

जगभरात – ७ लाख ८४ हजार ३८१ जणांना लागण, ३७ हजार ४८० मृत्यू

अमेरिका – १ लाख ६३ हजार रुग्णांना लागण, ३ हजार १४८ मृत्यू

इटली – १ लाख १ हजार ७०० जणांना लागण, मृत्यू ११ हजार ५९१, गेल्या २४ तासांत ८१२ बळी

भारत – १ हजार ३४७ जणांना लागण, ४३ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र – २२० जणांना कोरोनाची लागण, १० जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -