घरCORONA UPDATECorona Live Update : महाराष्ट्र टिकला पाहिजे, यासाठी आपण लढतोय - आरोग्य...

Corona Live Update : महाराष्ट्र टिकला पाहिजे, यासाठी आपण लढतोय – आरोग्य मंत्री

Subscribe

‘राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ६६६ इतकी झाली आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ३२ इतकी आहे’, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात अधिक संख्या ही मुंबईत असल्याचे दिसून येत आहे. तर ५०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मुंबईत ५० हजार पेक्षा अधिक टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ICMR ने दिलेले आपण नियम पाळत आहोत.


बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणखी ७ डॉक्टर आणि नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ झाली आहे. यात निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. बॉम्बे हॉस्पिटलमधील ५ डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यानंतर १४ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा ७ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यामध्ये ४ निवासी डॉक्टर आणि ३ परिचारिकांचा समावेश आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधील कोरोना पॉझिटिव्ह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या १२ झाली आहे. तर नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा सध्या शोध घेण्यात येत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात आतापर्यंत ४ हजार ४८३ कोरोना रुग्ण आढळून आले असून मुंबईत २८३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईतील १८७ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला महापौर निवासात क्वॉरंटाइन करुन घेतले आहे.


पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेले १६ जण निगेटिव्ह

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली. त्यानंतर दिल्लीच्या आरोग्य विभागाने डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या ७६ जणांना क्वॉरंटाइन केले होते. यातील आज १६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.


महापालिका मुख्यालयातील वॉर रुमला ‘कोरोना’ विषाणूची ठकठक 

कोरोना कोविड- १९ चा वॉर रुम ज्या महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षात आहेत, तेथील दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. (सविस्तर वाचा)


लष्कराला पाचारण करणे हा एकमेव पर्याय

राज्यात कोरोनाचे संकट असून आता मुंबईतील आकड्यामध्ये सर्वाधिक वाढ होत आहे. यामुळे आता विरोधक राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेवर टीका करताना दिसत आहेत. यातच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करणे हा एकमेव पर्याय असल्याचे ट्विट केले आहे. तसेच महापालिकेत खूप गोंधळ उडाला असून, जर काहीच बदलले नाही तर गोष्टी हाताबाहेर निघून जातील अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. एकमेकांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचेही ते म्हणाले आहेत. (सविस्तर वाचा)


देशात लॉकडाऊनचे उल्लंघन होत असल्याची प्रतिक्रिया गृह मंत्रालयाने दिली आहे. त्यासोबतच देशात १७ हजार २६५ कोरोना रुग्णांची संख्या असून गेल्या २४ तासात देशात ३६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १ हजार ५६३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच रुग्ण दुप्पट होण्याच्या संख्येमध्ये घसरण होत असल्याची मााहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. विशेष म्हणजे मुंबई, पुण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रात पथक तयार करण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.


पालघर मधील मॉब लिंचिंग प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी फेसबुक लाईव्ह मध्ये बोलले. ते म्हणाले की, पालघरमधील मॉब लिंचिंग प्रकरण अत्यंत निंदनीय आहे. पालघर मधील हल्ला हा गैरसमाजातून झाला आहे. याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पालघर प्रकरणातील ११० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली आहे. तसंच सोशल मीडियावर याबाबत आग लावणाऱ्याचा शोध घ्यावा असं देखील केंद्र सरकार पुढे मांडण्यात आलं आहे.


लॉकडाऊन उठल्याप्रमाणे लोक गर्दी करत असल्याचं कळतं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अजून निर्बंध वाढवले जातील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


कोरोनाची लागण झालेल्या २५ वर्षीय महिलेची सुखरूप प्रसृती झाली आहे. तिला १६ एप्रिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या बाळाला संसर्ग होऊ नये याकरिता वेगळ्या विभागात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती ससून रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची सकाळी ११ वाजेपर्यंतची संख्या ४४८३वर पोहोचली आहे. यात भिवंडी १,कल्याण डोंबिवली १६, मीरा भाईंदर ७, बृहन्मुंबई १८७, नागपूर १, नवी मुंबई ९, पनवेल ६, पिंपरी चिंचवड ९, रायगड २, सातारा १, सोलापूर १, ठाणे २१, वसई विरार २२ अशी एकूण २८३ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.


एएनआयच्या ट्विटनुसार, मुंबईतील काही पत्रकारांना कोरोना लागण झाल्याचं समोर येत आहे.

सविस्तर वाचा 

Coronavirus Crisis: मुंबईतील अनेक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह


राज्यातील कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी जनतेशी संंवाद साधला. लॉकडाऊन संपेपर्यंत घरी राहा असं त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे. तसंच मुलांनी रोज अभ्यास करत राहा असं त्यांनी यावेळी सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या की, राज्यात स्वतः आरोग्यमंत्री दौरे करत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आहेत. त्यामुळे हा काळ राजकारणाचा नसून समाजकारणाचा आहे.


आजपासून २७ एप्रिलपर्यंत संपूर्ण पुणे कंटेनमेंट झोन जाहीर. पुणे महानगर पालिकेच्या अखत्यारीत येणारा पूर्ण भाग कंटेनमेंट झोनमध्ये येणार.


देशभरातून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारांसाठी आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक लॉकडाऊनमुळे दिल्लीतच अडकले. रुग्णालयातला ओपीडी विभागच बंद करण्यात आल्यामुळे रुग्णांचे पुढचे उपचार कसे होणार? हा देखील प्रश्न या रुग्णांच्या नातेवाईकांसमोर उभा ठाकला आहे.


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात आजपासून टोलवसुली सुरू केली आहे. त्यानुसार वाशी टोलनाक्यावर देखील काल मध्यरात्री १२ वाजेपासून टोलवसुलीला सुरूवात करण्यात आली.


कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी जी-२० सर्व देशांच्या आरोग्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत कोरोनाशी टक्कर देण्यासाठी एकमेकांच्या सहाय्याने कसा लढा देता येईल, यावर चर्चा झाली.


जगभरात कोरोनाचे २४ लाख ७ हजार रुग्ण, त्यातले ७ लाख रुग्ण एकट्या अमेरिकेत. इटलीत कोरोनामुळे २३ हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू, तर इंग्लंडमध्ये एकाच दिवसात ५९७ जणांनी गमावला जीव!


गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत तब्बल १ हजार ९९७ कोरोना मृत्यूंंची नोंद झाली आहे.


देशभराप्रमाणे तमिळनाडूमध्ये देखील टोल वसुली सुरू करण्यात आली आहे.


राज्यभरात आजपासून कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या अटींवर उद्योगधंदे काही प्रमाणात सुरू झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र, इतर ठिकाणी ३ मेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -