घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकोरोना संकट : नगर जिल्ह्याच्या ६० गावांमध्ये लॉकडाऊन

कोरोना संकट : नगर जिल्ह्याच्या ६० गावांमध्ये लॉकडाऊन

Subscribe

कोरोनाबाधितांची वाढती संख्या बनली चिंताजनक, केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी

अहमदनगर – कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जनजीवन सुरळीत होत असतानाच, अहमदनगदर जिल्ह्यातील २० गावांमध्ये मात्र कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक बनली आहे. या जिल्ह्याच्या ११ तालुक्यांतील ६० गावांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असल्याने आता आजुबाजूच्या गावांनाही सतर्कता बाळगण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

४ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत हा लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. संगमनेर तालुक्यामधील २४, श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या ९, राहता तालुक्यामधील ७, तर पारनेर तालुक्यात असलेल्या ६ गावांमध्ये हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याशिवाय श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, कर्जत, कोपरगाव, अकोले तालुक्यांमधील काही गावांचाही यात समावेश आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -