घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेट13 जिल्ह्यांत सापडला कोरोनाचा नवा सबव्हेरिएंट; 'अशी' आहेत लक्षणे

13 जिल्ह्यांत सापडला कोरोनाचा नवा सबव्हेरिएंट; ‘अशी’ आहेत लक्षणे

Subscribe

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मागच्या 24 तासांत देशात कोरोनाचे 7 हजार 830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल 233 दिवसांनंतर देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मागच्या 24 तासांत देशात कोरोनाचे 7 हजार 830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल 233 दिवसांनंतर देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत देशात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असतानाच आता आणखी एक बातमी समोर येत आहे. ओमिक्राॅनचा सब व्हेरिएंट xbb.1.16 मध्ये म्यूटेशन झालं. त्यामुळे नवा सब व्हेरिएंट xbb.1.16 सापडला आहे.

भारतातील काही कोरोना प्रकरणात जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आलं आहे. यात म्यूटेटेड xbb.1.16.1 मुळे झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणण आहे. xbb.1.16.1 हा सब व्हेरिएंट xbb.1.16. चा एक भाग आहे. INSACOG ने दिलेल्या माहितीनुसार, देशातल्या 22 राज्यात 1 हजार 744 प्रकरणात xbb.1.16. सब व्हेरिएंट दिसून आला आहे. ( Corona Omicron new sub variant xbb 1 16 1 severity in india know the symptoms  )

- Advertisement -

xbb.1.16.1 हा व्हेरिएंट किती धोकादायक?

सब व्हेरिएंट xbb.1.16.1 हा किती धोकादायक आहे याचा शोध अद्याप लागलेला नाही. गेल्या वर्षी ओमायक्राॅन सब व्हेरिएंट xbb आला होता. त्यात म्यूटेशन होऊन xbb.1.16 आणि xbb.1.16.1 सब व्हेरिएंट पसरत चालले आहेत. एकट्या भारतात आतापर्यंत ओमिक्राॅनचे तब्बल 400 हून अधिक सब- व्हेरिएंट आढळले असून त्यात सर्वाधिक xbb चा समावेश आहे.

( हेही वाचा: 1 मे रोजी तुमची हत्या करणार; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी )

- Advertisement -

अशी आहेत लक्षणे

INSACOG ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत जितके कोरोना रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी जवळपास 38.2 प्रकरणे ही XBB.1.16 या सब व्हेरिएंटची आहेत. XBB.1.16 ची लक्षणं ओमिक्राॅनच्या इतर सब- व्हेरिएंटप्रमाणेच आहेत. यात ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी या लक्षणांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे ही लक्षणं जास्त गंभीर नाहीत. रुग्णांवर घरीच उपचार केले जाऊ शकतात. पण गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाला दाखल करणे गरजेचे आहे.

XBB.1.16 सब व्हेरिएंट वेगाने पसर आहे. लसीकरण झालेल्यांनाही या व्हेरिएंटची लागण होऊ शकते. त्यामुळे कोवीड नियमांचे पालनं करणं आवश्यक आहे. बूस्टर डोस घेतला नसेल तर तो घेणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा, सर्दी-खोकला झाला असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन डाॅक्टरांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -