घरताज्या घडामोडीCoronavirus: राज्यात पुन्हा निर्बंधाबाबतचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होणार; राजेश टोपेंचे संकेत

Coronavirus: राज्यात पुन्हा निर्बंधाबाबतचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होणार; राजेश टोपेंचे संकेत

Subscribe

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा राज्यात निर्बंध लागण्याचे संकेत दिले आहेत. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्या वाढतायत हा काळजीचा विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब टाक्स फोर्ससोबत बैठक घेण्यास सांगितले आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा निर्बंध वाढवण्याची गरज होऊ शकेल याविषयी या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे.

राज्यात २० जानेवारी दरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या ५०००-६००० दरम्यान होती. मात्र आता सक्रिय रुग्णांची संख्या ११, ४९२ झाली आहे. आज कदाचित ही संख्या २० हजारापर्यंत जाऊ शकते. तसेच मुंबईची परिस्थितीत पाहिली तर, २० जानेवारीदरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या ३०० होती आणि आता १३०० झाली आहे. आज मुंबई सक्रिय रुग्णांची संख्या २२०० होण्याची शक्यता आहे. मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट ४ टक्क्यांनी वाढला असून तो चांगला नाहीये. त्यामुळे काळजी घेण्याची गरज वाढली आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

पुढे टोपे म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे दिल्लीतील निर्बंध वाढवले आहेत. जे सुरुवातीला निर्बंध होते, त्याच निर्बंधांवर दिल्ली आली आहे. जर सध्याच्या आपण कोरोना परिस्थितीला सहजासहजी घेतले तर संख्यात्मक वाढ होऊन त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागेल. कोरोना नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. नियमांचे पालन केले नाही, तर कोरोना रुग्णांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आज किंवा उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निर्बंध वाढवण्याची गरज होऊ शकेल, याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. लग्न, मोठे कार्यक्रमात कोरोनाचे नियम पाळले जात नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमांवर पोलीस आणि प्रशासनाला बंधने आणावे लागतील.


हेही वाचा – Coronavirus: राज्यात जानेवारी, फेब्रुवारीत Covid-19 रुग्णसंख्येत मोठी वाढ अपेक्षित; खुद्द आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली भीती


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -