Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी corona outbreak: सांगलीत ऑक्सीजनअभावी ४ रुग्णांचा मृत्यू, प्रशासनाकडून जनतेची फसवणूक झाल्या सदाभाऊ...

corona outbreak: सांगलीत ऑक्सीजनअभावी ४ रुग्णांचा मृत्यू, प्रशासनाकडून जनतेची फसवणूक झाल्या सदाभाऊ खोत यांचा आरोप

वाढत्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे सांगली जिल्हा कोरोनाची स्मशानभूमी होत आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे. परंतु सांगलीमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. सांगलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे रेमडेसिवीर,ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परंतु प्रशासनाकडून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मंत्री म्हणत आहेत सांगलीमध्ये सर्व सुरळीत असून कसलीच कमतरता नाही, त्यामुळे मंत्र्यांनो हवेत गोळीबार करु नका, हवेतून जमिनीवर या असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना ६ महिन्यांपूर्वीच राज्य सरकारला सांगितले होते ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचे सांगितले होते. सांगलीमध्ये रुग्ण संख्या वाढली असल्याने रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे सांगली जिल्हा कोरोनाची स्मशानभूमी होत आहे. गुजरातमधून जो साठा येणार होता तो आला असता तर राज्याला थोडा दिलासा मिळाला होता. परंतु ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्यामुळे तो इंजेक्शन साठा मिळु शकला नाही. राज्य सरकारच्या असा वागणुकीमुळे उद्योजकांच्या मानात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीतीमुळे अनेक उद्योजक राज्यातून बाहेर जात आहेत.

- Advertisement -

पंढरपूर पोटनिवडणूक निकालावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या व्ह्यूरचना अचूक असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीसांनी प्रचार करताना मतदारांना सांगितले होते की, आमदार दिला तर येथील विकासकामे माझ्यावर सोडा, सरकारकडून कशी काम करुन घ्यायची हे मला माहित आहे असे वक्तव्य फडणवीसांनी केले होते. फडणवीसांच्या या वक्तव्यावर मतदारांनी विश्वास दाखवल्यामुळे भाजपचा झाल्याचा सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -