घरताज्या घडामोडीनागपूरमध्ये मिनी लॉकडाऊन करुनही लोकं ऐकेना, शेवटी उचलले 'हे' पाऊल

नागपूरमध्ये मिनी लॉकडाऊन करुनही लोकं ऐकेना, शेवटी उचलले ‘हे’ पाऊल

Subscribe

राज्यामध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इतर जिल्ह्याप्रमाणे नागपूरमध्ये देखील आजपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर प्रशासनाने जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन लावूनही कोरोनाची परिस्थिती काही आटोक्यात आली नाही. त्यामुळे शेवटी प्रशासनाला फौजदारी दंड संहिता प्रक्रिया १४४ (१) (३)नुसार उपराजधानीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण सतत वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागपूर प्रशासनाने शनिवारी आणि रविवारी मिनी लॉकडाऊन लागू केला होता. तरी देखील नागपूरमध्ये नागरिक बिनधास्तपणे, कोणती फिकीर न करता घराबाहेर फिरताना दिसले. काही जण कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे देखील दिसून आले. त्यामुळे ही गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून नागपूरच्या नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

तसेच नागपूरमधील परिस्थिती गंभीर होत असल्यामुळे पोलिस आयुक्तांनी रविवारी रात्री उशीरा जमावबंदीचे आदेश जारी केले. नागपूरमध्ये ही जमावबंदी ३१ मार्चपर्यंत असून नागरिकांना आतातरी पोलिसांना सहकार्य करावे, अशे आवाहान पोलिस आयुक्तांनी केले आहे. पण जमावबंदीचा नियम अंत्यसंस्कारासाठी लागू होणार नाही आहे. पण दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान आतापर्यंत नागपूरात सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क घालणे या महत्त्वांच्या नियमांचे पालन न केल्यामुळे १९८ लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनाची लस टोचून

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -