Covid-19 रुग्णसंख्येत महाराष्ट्राने जर्मनीला केले ओव्हरटेक!

Duke University claims to have a worse epidemic than Corona in after 60 years
काय सांगता! ६० वर्षांनी येणार कोरोनापेक्षा भयंकर महामारी, ड्यूक युनिव्हर्सिटीचा दावा

महाराष्ट्रातला कोरोनाचा आलेख हा वाढतानाच दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येने कोलंबियाला देशाला मागे टाकत जगातील कोरोना यादीत ११व्या स्थानावर झेप घेतली होती. आता देखील जागतिक कोरोना यादीत महाराष्ट्राने जर्मनी सारख्या प्रगत देशाला मागे टाकले आहे. जर्मनीत कोरोना वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुन्हा एकदा फ्रान्स पाठोपाठ लॉकडाऊन घोषित केला होता. जर्मनीत सध्या जागतिक कोरोना यादीत १०व्या स्थानावर आहे.

महाराष्ट्राची सध्याची कोरोना परिस्थिती काय?

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्येत विक्रमी वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र अनेक देशांमध्ये मागे टाकत जागतिक यादीत टॉप १०मध्ये पोहोचला आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात ४३ हजार १८३ नवे कोरोनाबाधित आढळले असून २४९ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच ३२ हजार ६४१ जण कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २८ लाख ५६ हजार १६३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५४ हजार ८९८ रुग्ण मृत्यूमुखी पडले असून २४ लाख ३३ हजार ३६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ३ लाख ६६ हजार ५३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती पाहता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरी देखील पुन्हा एका लॉकडाऊन घोषित करणार की काय? अशी भिती सर्वसामान्यांच्या मनात आहे.

जर्मनीत लॉकडाऊन, सध्याची परिस्थिती….

काही दिवसांपूर्वी जर्मनीत कठोर लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली. ५ दिवसांचा जर्मनीत लॉकडाऊन आहे. १ एप्रिल ते ५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या ५ दिवसांमध्ये फक्त एकच दिवशी अन्न-धान्यांची दुकाने खुली राहणार ती म्हणजे ३ एप्रिलला. तसेच ईस्टर आणि गुड फ्रायडेमुळेही जर्मनी कडक निर्बंध करण्यात आले आहेत. सध्या जर्मनीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख ५४ हजार १३७ असून यापैकी आतापर्यंत ७७ हजार २४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ लाख ४८ हजार २०० जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – देशात कोरोनाचा कहर! २४ तासांत आढळले ८१ हजारांहून अधिक रुग्ण