घरदेश-विदेशभारतात करोना रुग्णांचा ५८ टक्के रिकव्हरी रेट

भारतात करोना रुग्णांचा ५८ टक्के रिकव्हरी रेट

Subscribe

भारतातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८ टक्के झाला आहे, सध्याच्या घडीला साधारणतः देशभरातले तीन लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर देशातील करोना रुग्णांचा मृत्यूदर हा अवघा ३ टक्के आहे, जो इतर देशांच्या तुलनेत अत्यल्प आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

देशात करोनाने संक्रमित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा रेट हा १९ दिवसांवर पोहोचला आहे. लॉकडाऊनच्या आधी हे प्रमाण ३ दिवसांवर होते, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. भारतात मागील चोवीस तासात ५ लाख ८ हजार ९५३ करोना रुग्ण संख्या झाली आहे. त्यापैकी २ लाख ९५ हजार ८८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मागील २४ तासांमध्ये करोनाचे १० हजार २४५ रुग्ण बरे झाले आहेत, तर १ लाख ९७ हजार ३८७ रुग्ण हे अ‍ॅक्टिव्ह आहेत. आतापर्यंत करोनाची लागण होऊन देशभरात १५ हजार ६०० जणांचा मृत्यू झाले आहेत. देशात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वेगाने वाढत आहे. ही बाब भारतासाठी चांगली आहे, अशीही माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

- Advertisement -

भारतात १४९ दिवसांत ५ लाख रुग्ण संख्या
30 जानेवारीला देशात पहिला करोनाचा रुग्ण सापडला होता. यानंतर 110 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी ही संख्या 1 लाखावर गेली होती. पुढे करोनाच्या संक्रमणाचा वेग एवढा वाढला की, केवळ 15 दिवसांतच हा आकडा दोन लाखावर गेला. यानंतर हा आकडा तीन लाख होण्यासाठी 10 दिवस लागले. हा वेग आणखी वाढून 4 लाखांवर हा आकडा जाण्यासाठी 8 दिवस लागले., तर चार लाखांवरून पाच लाखांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ 6 दिवसांचा कालावधी लागला आहे. पाच लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी भारताला 149 दिवस लागले आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारतातील करोनाचा वेग कमी आहे. अमेरिकेमध्ये सर्वात वेगाने प्रसार झाला होता. केवळ 82 दिवसांत अमेरिकेमध्ये पाच लाखांचा टप्पा ओलांडला होता. जगभरात करोनाचा हाहाःकार पाहायला मिळत आहे. सर्वच देश करोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगातील करोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 99 लाखांवर गेली आहे, तर आतापर्यंत 4 लाख 96 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -