घरमहाराष्ट्रधक्कादायक! रुग्णवाहिकेअभावी कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह नेण्यास घंटागाडीचा वापर

धक्कादायक! रुग्णवाहिकेअभावी कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह नेण्यास घंटागाडीचा वापर

Subscribe

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात येईल की काय? अशी शंका नागरिकांच्या मनात आहे. कोरोनाच्या संसर्गादरम्यान सर्वसामान्य लोकं आपला जीव मुठीत घेऊन पोटाची खळगी भरताना दिसताय. अशा परिस्थितीत, राज्यात माणुसकीला काळीमा फासण्याच्या घटनाही पाहायला मिळत आहेत. अशीच एक घटना महाराष्ट्रातील धुळे येथे घडली असून प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे उघडकीस आले आहे.

असा घडला प्रकार

धुळ्यात राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीला गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. या वृद्ध रुग्णावर कोरोनाचे उपचार करण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र यादरम्यानच त्या रूग्णाचा जीव गेला. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेनंतर पीडित कुटुंबाचे असे म्हणणे आहे की, मृतदेह आपल्या गावाकडे नेण्यासाठी प्रशासनाकडे रूग्णवाहिकेची मागणी केली होती. मात्र दहा तासांच्या प्रतिक्षेनंतर देखील त्यांना रुग्णवाहिका देण्यात आली नव्हती. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गावकऱ्यांच्या मदतीने या वृद्धाचा मृतदेह कचऱ्याच्या गाडीत (घंटागाडी) टाकून त्याला स्मशानभूमीत नेण्यात आले आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असे देखील कुटुंबीयांकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असून शनिवारी ५५ हजार ४११ नवीन रुग्णांची नोंद असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाख ४३ हजार ९५१ झाली आहे, तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ३६ हजार ६८२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ३०,४१,०८० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २५,२९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के एवढा आहे. शनिवारी ५३,००५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.१८ टक्के एवढे झाले आहे.


 

- Advertisement -

 

 

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -