राज्यात ३,६५९ नव्या कोरोना रूग्णांची भर; मुंबईत सर्वाधिक रूग्णसंख्या

राज्यासह मुंबईमध्ये (Mumbai) कोरोनाच्या रूग्णांमध्ये (Corona Patients) झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक रूग्णांची नोंद मुंबईत करण्यात आली आहे. मुंबईत १७५१ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

राज्यासह मुंबईमध्ये (Mumbai) कोरोनाच्या रूग्णांमध्ये (Corona Patients) झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक रूग्णांची नोंद मुंबईत करण्यात आली आहे. मुंबईत १७५१ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, राज्यात (Maharashtra) ३६५९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज दिवसभरात एका रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Corona Patients Increased In Maharashtra)

सध्या राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दर ९७.८३ टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. मृत्यूदर १.८६ टक्के झाला आहे. सध्या राज्यात २४,९१५ सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक १४,१४६ इतके कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. यामुळे मुंबईकरांसह राज्याची चिंता वाढली आहे.

ठाण्यामध्ये ५ हजार ५६९ सक्रिय रुग्ण

या पाठोपाठ ठाण्यामध्ये ५ हजार ५६९ सक्रिय रुग्ण आहेत. दुसरीकडे देशात गेल्या २४ तासांत ९,९२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ७९ हजार ३१३ रुग्ण कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहेत.

मुंबईच्या अंधेरी (Andheri) भागात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईमध्ये गेल्या आठवडाभरात अंधेरी पश्चिम (Andheri West) भागात १ हजार ४४१ रुग्ण, अंधेरी पूर्व भागात ९१५ रुग्ण आढळले आहेत. शहरातील २४ विभागांमधील सहा भाग वगळता अन्य भागांमध्ये दर आठवड्याला नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ५०० च्याही वर गेली आहे.

अंधेरीत सर्वाधिक रुग्ण

रुग्णवाढीच्या यादीमध्ये अंधेरीत सर्वाधिक रुग्ण असून त्याखाली चेंबूर, कुलाबा, वांद्रे भागामध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २८४ दिवसांपेक्षाही कमी झाला आहे. शहरात अंधेरीपाठोपाठ वांद्रे परिसरात करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ कायम आहे. वांद्रे परिसरात आठवडाभरात ९४५ रुग्ण नव्याने आढळले आहेत.


हेही वाचा – मुंबईतील ‘या’ भागात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक