धोका वाढला! महाराष्ट्रात 1081 नवे कोरोना रुग्ण; मुंबईत चार महिन्यांचा रेकॉर्ड मोडला, आरोग्य यंत्रणा सतर्क

मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना प्रादुर्भाव (Corona) कमी झाला असला तरी, सध्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. बुधवारी राज्यात १०८१ रुग्णांची नोंद झाली असून, मुंबईत ७३९ रुग्णांची नोंद झाली आहे.

India Corona Update 11,499 fresh COVID19 cases and 255 deaths in the last 24 hours

मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना प्रादुर्भाव (Corona) कमी झाला असला तरी, सध्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. बुधवारी राज्यात १०८१ रुग्णांची नोंद झाली असून, मुंबईत ७३९ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्यस्थितीतील ही रुग्णवाढ मोठी चार महिन्यानंतर सर्वात मोठी असल्याचे मानले जात आहे. तसेच, २४ फेब्रुवारीनंतरची महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्णसंख्या बुधवारी आढळली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरात निर्बंध लागणार का, यावर चर्चा रंगल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यासह देशभरातील सर्व नियम (Covid 19 Rules) शिथिल करण्यात आले. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणावरही भर देण्यात आला होता. परंतु, त्यानंतर सुद्धा कोरोनाने देशाच्या अनेक राज्यांमध्ये डोके वर काढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, सुरक्षेच्या दृष्टीने सरकारनेही काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. तर, गेल्या २४ तासात कोरोना संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईत सध्या २९७० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत करोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या १० लाख ६६ हजार ५४१ वर पोहोचली आहे. तर, १९५६६ रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. मुंबईत ४ फेब्रुवारी रोजी ८४६ करोना रुग्णांची नोंद झाली होती.

दरम्यान कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत देशभरातील अनेक भागांत होत आहे. याच पार्श्वभूमीवर तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमण्यम यांनी राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीसाठी इतर राज्यांतून विशेषत: उत्तर भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जबाबदार धरले. मात्र, परिस्थिती अद्याप धोकादायक पातळीवर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘हर घर दस्तक 2.0’

देशभरात पुन्हा कोरोनाची साथ येऊ नये याची खबरदारी घेत सरकारने लसीकरणाला गती देण्यासाठी बुधवारपासून विशेष मोहीम सुरू केली. ‘हर घर दस्तक 2.0’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात वृद्धाश्रम, शाळा, महाविद्यालये आणि तुरुंगांमध्ये लसीकरणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मिशन मोडमध्ये घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, ‘हर घर दस्तक 2.0’ मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे घरोघरी जाऊन सर्व पात्र लोकांना प्रथम, द्वितीय आणि दक्षता डोस दिले जाणार आहे.

60 वर्षांवरील व्यक्तींना दक्षता डोस

12 ते 14 वयोगटातील लसीकरण आणि 60 वर्षांवरील व्यक्तींना दक्षता डोस देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वृद्धाश्रम, शाळा, महाविद्यालये, तुरुंग, वीटभट्ट्या यासारख्या ठिकाणी विशेष लक्ष दिले जाईल.


हेही वाचा – अमृत महोत्सवी वर्षात लालपरीचे आधुनिक पाऊल, पुणे-अहमदनगर शिवाई या विद्युत बससेवेचा शुभारंभ