घरCORONA UPDATEआता कोरोना पॉझिटिव्हवर घरीच होणार उपचार, 'या' असतील अटी!

आता कोरोना पॉझिटिव्हवर घरीच होणार उपचार, ‘या’ असतील अटी!

Subscribe

गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत कोरोनाची चाचणी करण्याची गरज नाही.

देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाच्या रूग्णांनी पालिकेच्या रूग्णालयात पाय ठेवायलाही आता जागा नाहीये. पण यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळेच पाचव्या लॉकडाऊनमध्ये अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. नियम व अटींमध्ये काही प्रमाणात शिथीलता आणली आहे. यामध्ये आणखी एक बदल करण्यात आला आहे. जे रूग्ण बाधित आहेत मात्र ज्यांच्यामध्ये लक्षण दिसत नाहीत अशा रूग्णांना घरीच विलगीकरण कक्षात राहू देण्याचे निर्देश राज्य सरकराने दिले आहेत.

काय आहे नवीन शिथीलता

ज्या रूग्णांचे अहवाल बाधित आहेत. मात्र ज्या रूग्णांना अतिसौम्य किंवा लक्षणेच नसतील अशा रूग्णांना घरीच उपचार घेतले जातील. यामध्येही तीन प्रकारात विलगीकरण करण्यात आले आहे. राज्या सरकारच्या नव्या नियमानुसार लक्षणं सौम्य, अति सौम्य लक्षणे, मध्य तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणे असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यातील अती सौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना रूग्णांना घरीच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- Advertisement -

अशा आहेत सुचना

१. उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्णास अती सौम्य किंवा लक्षणे नसल्यासबद्दल प्रमाणित केलेले असावे.

२. त्या रूग्णाच्या घरी योग्य सुविधा असणे गरजेचे आहे

- Advertisement -

३. घरी चौवीस तास काळजी घेणारं कोणीतरी व्यक्ती असणे गरजेचं आहे.

४. रूग्णांची काळजी घेणारी व्यक्ती आणि रूग्णालय यांच्यात संपर्क असणे गरजेचं आहे.

५. काळजी घेणारी व्यक्ती व संपर्कातील व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन घ्यावी.

६. मोबाईलवर आरोग्य सेतू अप असणे गरजेचे आहे.

७. रूग्णांनी स्वत:ची काळजी घेणे व नियमीतपणे प्रकृतीबाबत पाठपुराव्याविषयी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी/ पथकास माहिती देणे अनिवार्य आहे.

८. रूग्णाने स्वत:चे गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्र भरून द्यावे

अशी घ्यावी वैद्यकीय मदत

१. रूग्णाने स्वत: व काळजीवाहू व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे

२. कोणतेही गंभीर लक्षणे असल्यास वैद्यकीय मदत घ्यावी

३. धाप लागणे, श्वासोच्छवास अडथळा निर्माण होणे, छातीमध्ये सतत दुखणे, वेदना होणे, शुध्द हरपणे, ओठ व चेहरा निळसर पडणे

गृह विलगीकरण केलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १७ दिवसांनंतर, किंवा चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतलेला असेल तेथून १७ दिवसांनंतर आणि मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर गृह विलगीकरणातून व्यक्तीस मुक्त करावे. गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत कोरोनाची चाचणी करण्याची गरज नाही.


हे ही वाचा – ‘XXX 2’: ‘हिंदूस्थान भाऊने मला बलात्काराची धमकी दिली आहे….’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -