घरCORONA UPDATEधक्कादायक! ८ व्यापाऱ्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट अर्ध्या तासातच झाला निगेटिव्ह

धक्कादायक! ८ व्यापाऱ्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट अर्ध्या तासातच झाला निगेटिव्ह

Subscribe

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता कोरोना चाचण्यांवर अधिक भर देण्यात दिला जात आहे. पण यादरम्यान उस्मानाबादमधून धक्कादायक बाब समोर आली आहे. उस्मानाबादमधील ८ व्यापाऱ्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट अर्ध्या तासातच निगेटिव्ह आला आहे. आधी या ८ व्यापाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता, पण खात्री करून घेण्यासाठी दुसऱ्यांदा जेव्हा चाचणी करण्यात आली तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व्यापाऱ्याच्या अँटीजेन चाचण्या केल्या जात होत्या. त्यावेळेस या ८ व्यापाऱ्यांनी अँटीजेन चाचणी केली. पण अवघ्या अर्ध्या तासातच पुन्हा एकदा यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे अँटीजेन चाचण्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. शिवाय यामुळे व्यापाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisement -

उस्मानाबादमध्ये व्यापारांना अँटीजेन चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे नियमांनुसार व्यापाऱ्यांच्या अँटीजेन चाचण्यात करण्यात आल्या. त्यामधील ८ पॉझिटिव्ह व्यापाऱ्यांना आपल्यात काही लक्षणे नसताच आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा आला? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या ८ व्यापाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात पुन्हा चाचण्या केल्या. त्यादरम्यान त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. पण प्रशासनाने आधीच्या आलेल्या पॉझिटिव्ह अहवालाच्या आधारावर त्यांना क्वारंटाईन केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण या घटनेमुळे सध्या ज्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत, त्यांचे अहवाल किती खरे आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात पुरेशा बेड्सी उपलब्धता – राजेश टोपे

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -