घरताज्या घडामोडीकरोनामुळे एमएचटी सीईटी परीक्षा पुढे ढकलली!

करोनामुळे एमएचटी सीईटी परीक्षा पुढे ढकलली!

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन असल्याने सीईटी सेलच्या वतीने १३ ते १७ एप्रिल दरम्यान होणारी एमएचटी सीईटी पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यभरातून तब्बल ५ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत, तब्बल ९ दिवस १८ शिप्ट मध्ये ही परीक्षा १३ एप्रिलपासून होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १४ एप्रिलपर्यंत भारत बंदची घोषणा केल्याने सीईटी सेलने आता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात म्हणजे १३ ते १७ एप्रिल या काळात आणि २० ते २३ एप्रिल या दरम्यान ९ दिवसाच्या काळात १८ सत्रात ही परीक्षेचे वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले होते. राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी घेण्यात येते. दरवर्षी पेक्षा यंदा या परीक्षेला १ लाख ११ हजार ६१३ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. तर राज्याबाहेरचे विद्यार्थी १६ हजार ९६२ बसणार आहेत.

- Advertisement -

विद्यार्थी नोंदणी

पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) ः २४८६६१

- Advertisement -

पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) ः २७६२४६

एकूण ः ५२४९०७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -