घरCORONA UPDATECoronavirus : शिवसेना आमदार आणि उपनेत्याच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!

Coronavirus : शिवसेना आमदार आणि उपनेत्याच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!

Subscribe

भायखळ्याचा आमदार यामिनी जाधव आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानापर्यंत कोरोना पोहोचला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे निवासस्थानापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग पोहोचलेला असतानाच भायखळ्याचा आमदार यामिनी जाधव आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानापर्यंत कोरोना पोहोचला आहे. आमदार यामिनी जाधव व शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांचे निवासस्थान असलेल्या माझगाव येथील सेंट मेरी रोडवरील एका इमारतीतच कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. जाधव यांच्या निवासस्थानासमोरीलच इमारतीत संबंधित रुग्ण आढळून आल्यामुळे हा संपूर्ण परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून यामुळे आता जाधव कुटुंबच आता होम क्वारंटाईनमध्ये अडकून पडले आहे.

माझगाव येथील सेंट मेरी रोड येथील हुसैन इमारतीत एकाचा करोनामुळे दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. बोरी कुटुंबातील एक व्यक्ती दुबईवरून आलेली होती. त्याला ताप, खोकला येत असल्यामुळे प्रिन्स अलीमध्ये दाखल केले होते. त्यानंतर तिथून परळमधील ग्लोबल रुग्णालयात दाखल केले होते. परंतु तिथेच त्याचा मृत्यू झाला. परंतु याचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तात्काल महापालिका व पोलिस यांनी त्यांची हुसैन इमारत सिल केली आणि आसपासचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केले.

- Advertisement -

या हुसैन इमारतीसमोरच बिलाकडी चेंबर हा टॉवर आहे. या टॉवरमध्ये भायखळ्याचा शिवसेना आमदार यामिनी जाधव व शिवसेना उपनेते तथा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे हा परिसर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आल्यामुळे येथील प्रत्येक कुटुंब होम क्वारंटाईनमध्येच आहेत. कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकच्यावतीने जंतूनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या मृताच्या निकटच्या संपर्कातील नातेवाईकांसह लोकांना क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात असून त्या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यांचा चाचणी अहवाल प्रलंबित आहे असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

ई -विभागातील चिंचपोकळी, माझगाव डॉक, दारुखाना, भायखळा आदी भागांमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. सध्या मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचे करोना रुग्ण या ई -विभागात आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त आढळून आलेल्या ठिकाणी वैद्यकीय शिबिर आयोजित करून आसपासच्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -