Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र पुण्यात पुढील आदेशापर्यंत निर्बंध कायम; शाळा, कॉलेज बंद, हॉटेल चालकांना सवलतींसाठी प्रतीक्षा

पुण्यात पुढील आदेशापर्यंत निर्बंध कायम; शाळा, कॉलेज बंद, हॉटेल चालकांना सवलतींसाठी प्रतीक्षा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग आणि बाधितांचा आकडा जरी नियंत्रित असला तरी कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येत नाही आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या हद्दीत सध्या लागू असलेले प्रतिबंधात्मक नियम पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे, असा आदेश पुणे महापालिकेने जारी केला आहे. त्यामुळे पुण्यात शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहे. यासह व्यापारी; तसेच हॉटेलचालकांना निर्बंधांमधील सवलतींसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यानुसार, पुण्यात येत्या आठवड्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. शनिवार, रविवार विकेंडला अत्यावश्यक सुविधा वगळता कडक निर्बंध लागू राहणार आहेत. तसेच पर्यटन स्थळांवर देखील बंदी राहणार आहे. पुणे शहरात पॉझिटिव्हीटी दर हा ५ टक्क्यांच्या खाली असून देखील तेथील कोरोना निर्बंध प्रशासनाकडून शिथील करण्यात आले नाही आणि प्रशासन त्याकरता तयार नाही.

- Advertisement -