Corona Situation: कोरोना परिस्थिती हाताळण्यामध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी, हायकोर्टाने थोपटली महाविकास आघाडीची सरकारची पाठ

Corona Situation mumbai high court praises maharashtra government for handling corona situation

कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीला हाताळण्यामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आग्रस्थानी असल्याचे हायकोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारने चांगल्या प्रकारे कोरोना परिस्थिती आटोक्यात आणली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे अनुकरण इतर नगरपालिकांनी देखील केलं पाहिजे असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना काळात भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभार केल्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली होती. परंतु हायकोर्टानेच आता राज्य सरकारची पाठ थोपाटली असून कौतुक केलं आहे.

मुंबई हायकोर्टामध्ये कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन ठाकरे सरकारविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. यावेळी विविधी समस्यांवर दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका निकाली काढण्यात आल्या. कोरोना काळातील समस्यांवर सुनावणी करताना हायकोर्टाने राज्य सरकारच्या कोरोना परिस्थितीमधील कामाचे चांगलेच कौतुक केलं आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यामध्ये महाराष्ट्र चांगले काम करत असून देशात अग्रस्थानी असल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे.

ठाकरे सरकार चांगले काम करत आहे

महाराष्ट्र कोरोना परिस्थित हाताळण्यात अग्रस्थानी आहे. याबाबत आम्ही ठाम सांगू शकतो. तसेच आता वाईट दिवस विसरायला पााहिजे असेही मुख्य न्यायाधीशांनी सांगितले आहे.

राज्य सरकारविरोधात कोरोना काळातील कामावरुन अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये मुंबई आणि राज्यातील रुग्णालयात खाटांची कमतरता, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, लसीकरणामध्ये आलेल्या विविधी समस्या, ज्येष्ठ नागरिकांना उद्भवलेल्या समस्या अशा अनेक समस्यांवर अनेक जनहित याचिका राज्य सरकारविरोधात करण्यात आल्या होत्या.

हायकोर्टात अनेक याचिकांवर याआधी देखील सुनावणी करण्यात आली होती. यावेळी देखील राज्य सरकारने कोरोना परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे कौतुक केलं होते. आता पुन्हा एकदा राज्य सरकार चांगल काम करत असल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच राज्य सरकारला काही कठोर निर्देश देखील हायकोर्टाने दिले आहेत.


हेही वाचा : एसटीत मोठा भ्रष्टाचार; तो थांबला तरच प्रश्न सुटेल