घरCORONA UPDATECorona Strict Restriction : राज्य सरकारकडून मिनी लॉकडाऊनची घोषणा, नेमके नियम कोणते?...

Corona Strict Restriction : राज्य सरकारकडून मिनी लॉकडाऊनची घोषणा, नेमके नियम कोणते? जाणून घ्या

Subscribe

खाजगी कार्यालयांतही ५० टक्के उपस्थितीची परवानगी दिली आहे. तसेच व्यायाम शाळा, स्पा,स्विमींग पूल बंद ठेवण्याचे निर्देश नियमावलीमध्ये देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये काय बंद आणि काय चालू ते पाहा

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने राज्यात कडक निर्बंध लागू करत मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा अत्यावश्यक कामाशिवाय ५ पेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसेच दोन लसीचे डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहनातून प्रवास करता येणार आहे. २४ तास कार्यरत असणाऱ्या अस्थापनांना अत्यावश्यक सेवेत मोडण्यात आले आहे. दरम्यान लोकलबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. कोरोना नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारासुद्धा मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिला आहे. खाजगी कार्यालयांतही ५० टक्के उपस्थितीची परवानगी दिली आहे. तसेच व्यायाम शाळा, स्पा,स्विमींग पूल बंद ठेवण्याचे निर्देश नियमावलीमध्ये देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये काय बंद आणि काय चालू ते पाहा.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे नेमके नियम कोणते?

– पूर्वनियोजित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार

-एमपीएससी, युपीएससीच्या परीक्षांना परवानगी असेल

- Advertisement -

– रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल, या वेळेत कोणालाही फिरता किंवा प्रवास करता येणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असेल.

– जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांना कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी असेल. तसेच विना प्रेक्षक परवानगी देण्यात आली आहे.

– सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह राजकीय कार्यक्रमांना परवानगी असेल.

– आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्राच्या परवानगीप्रमाणे होणार आहे.

– राज्यांतर्गत प्रवासासाठी आरटीपीसीआर चाचणी ७२ तासात केलेली असावी. तसेच त्याचा अहवाल निगेटिव्ही असणं बंधनकारक आहे.

राज्यात काय सुरु राहणार ?

– हॉटेल, रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार केवळ ५० टक्के आसन व्यवस्था ठेवण्यात येणार

– शॉपिंग मॉलमध्ये ५० टक्के क्षमता बंधनकारक

– चित्रपटगृह आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेनं सुरु राहणार

– पहिल्या लाटेत सलून बंद असल्याने नुकसान झाले होते. यामुळे आता ५० टक्के क्षमतेनं सलून सुरु ठेवण्याची परवानगी

काय बंद राहणार ?

– राज्यातील सगळ्या प्रकारची पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात येणार

– स्विमींग पूल, व्यायाम शाळा आणि स्पा १०० टक्के बंद राहणार

– मैदान, संग्रहालये, बाग, प्राणी संग्रहालय, गडकिल्ले पर्यटकांसाठी बंद असतील

– शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

– लग्न कार्यासाठी ५० लोकांची उपस्थिती असणे बंधनकारक

– अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना परवानगी

– सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना ५० लोकांची उपस्थिती असेल.


हेही वाचा : Corona Strict Restriction : रोजीरोटी बंद करायची नाही पण नियम पाळण्यात हलगर्जीपणा नको, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -