घरCORONA UPDATEकोरोना संशयित रुग्णाने खासगी वाहनाने गाठले कस्तुरबा रुग्णालय!

कोरोना संशयित रुग्णाने खासगी वाहनाने गाठले कस्तुरबा रुग्णालय!

Subscribe

रुग्णवाहिका नसल्यानं त्या तरुणाने चक्क  स्वतःच्या गाडीने चालक आणि आईवडील यांच्यासह कस्तुरबा रुग्णालय गाठल्याच प्रकरण समोर आलंय.

एका कोरोना संशयित रुग्णाला केडीएमसी आरोग्य विभागाने कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, रुग्णवाहिका नसल्यानं त्या तरुणाने चक्क  स्वतःच्या गाडीने चालक आणि आईवडील यांच्यासह कस्तुरबा रुग्णालय गाठल्याच प्रकरण समोर आलंय. तिथे गेल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं, मात्र त्याच्या आई वडिलांना चाचणीही न करता पुन्हा माघारी धाडण्यात आलं असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती तरुणाला देण्यात आली. हलगर्जीपणा असल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
डोंबिवलीतील लग्न समारंभात हा तरुण सहभागी झाला होता. कोरोनाग्रस्त तरुण लग्नात सहभागी झाल्यानंतर डोंबिवली मधील काही परिसर सील केले आहेत. त्यातील काही जणांना होम क्वारनटाईन केलं गेलय. मात्र या रुग्णाला पालिकेने कस्तूरबा हाॅस्पिटलला जायची व्यवस्था केली नसून कोरोना बाधित रुग्णाला चक्क खाजगी वाहनातून कस्तूरबाला पाठवले आहे. त्यामुळे त्या तरुणाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यात आणखी धक्कादायक म्हणजे या कोरोना बाधित रुग्णासोबत त्याचे कुटूंब देखील कोरोना बाधित चाचणी करता कस्तूरबा रुग्णालयात गेले होते. पण त्यांना त्यांची चाचणी न करताच घरी परत पाठवण्यात आले. ज्यामुळे कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांना असं सोडणे कितपत योग्य आहे ? असा प्रश्न उपस्थित होतोय.
कल्याण डोंबिवलीत कोरोना बाधितांची संख्या वाढतेय. मात्र पालिकेच्या रुग्णालयात अजूनही कोणत्याच सोयी सुविधा नाहीत. तसेच तातडीने रूग्णवाहिका उपलब्ध होत नाही. डोंबिवली येथील शास्त्रीनगर हाॅस्पिटल आयसोलेशन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोना संशयीत रुग्णांना अशाप्रकारे सोडणे सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याकडे लक्ष देतील का ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -