Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यास कोरोना टेस्ट बंधनकारक, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यास कोरोना टेस्ट बंधनकारक, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

कोरोना टेस्ट करणे बंधनकारक

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सध्या कोरोना रुग्ण संख्या वाढीचा आलेख चढता असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन मध्ये कोणतीही सूट देण्यात येणार नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करत जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांना बंदी नाही. मात्र येताना किंवा आल्यावर कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन ९४० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना रुग्ण संख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, जिल्हा माहिती अधिकारी हेमंत चव्हाण उपस्थित होते. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसा पासून कोरोना बाधीत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच एका दिवसात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार झाला त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे स्पष्ट झाले आहे ही गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व नागरिकांनी कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.

- Advertisement -

कोरोना रोखण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी मिनी लॉकडाऊन लागू करून निर्बंध घातले आहेत त्यात कसलीही सूट मिळणार नाही. आशा स्पष्ट सूचना आज झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये दिल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने जे निर्बंध लागू केले आहेत ते जशाच्या तसे लागू केले आहेत त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना मिनी लॉकडाऊनचे कडक नियम पाळावेच लागतील त्यात सूट मिळणार नाही त्यामुळे जिल्ह्यतील नागरिकांनी जागरूक राहून नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.

दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी आहे त्याचे पालन करावेच लागणार आहे. मात्र वाहतूक सेवा सुरूच राहणार आहे. शनिवार व रविवारच्या दिवशी कडक लॉकडाऊन असणार आहे त्या दिवशी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील तर ऑटोरिक्षाना अपवादात्मक रित्या सेवा सुरू ठेवता येणार आहेत.

कोरोना टेस्ट करणे बंधनकारक

- Advertisement -

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांना कुणालाही बंदी घातलेली नाही मात्र जिल्ह्यात येताना किंवा जिल्ह्यात आल्यावर प्रत्येकाने कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. लग्न सभारंभ करताना प्रत्येकाने कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक सुरु ठेवत असताना त्यांनाही कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनीही कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.


हेही वाचा : अजितदादा तुम्ही सुद्धा Break The Chain मोहीम विसरलात


 

- Advertisement -