घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गात प्रवेश करण्यासाठी करावी लागणार कोरोना टेस्ट

सिंधुदुर्गात प्रवेश करण्यासाठी करावी लागणार कोरोना टेस्ट

Subscribe

दिल्ली, गोवा, राजस्थान, केरळ वरून येणाऱ्यांना कोरोना तपासणी बंधनकारक

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मंगल कार्यालये, धार्मिक कार्यक्रमासह देवस्थान व पर्यटन स्थळावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. ५० पेक्षा कमी व्यक्तीचा सहभाग , मास्क, सॅनिटायझर सुविधांचा वापर होतो की नाही याची कसून तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली व सर्वानी नियम पाळा. जिल्हा लॉकडाऊनमध्ये जायची वेळ आणू नका, असे आवाहनही केले आहे. दरम्यान दिल्ली,गोवा,राजस्थान, केरळ या राज्यातून येणाऱ्या व्यक्तींना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक केले असून या राज्यातून गावात आलेल्या व्यक्तीची माहिती देण्याचे आवाहन सर्व ग्रामसमित्याना केले आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यास जिल्ह्याच्या पत्रादेवी व खारेपाटण येथे प्रवेश द्वारावर महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे पथक नेमून तपासणी केली जाणार अशी माहिती दिली.

- Advertisement -

जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी माहिती देताना सांगितले की, अमरावती जिल्ह्यासह पुणे ,मुंबई या ठिकाणी कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत त्याठिकाणी लॉकडाऊन सुरु झाले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत नसले तरी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्ती मुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो त्यामुळे आतापासून सतर्क राहिले पाहिजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्या प्रमाणे आता ‘माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जाणार आहे ही मोहीम लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून मास्कचा वापर करणे,गर्दीत जायचे टाळणे सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

सर्व नागरिकांनी चांगली साथ दिल्यामुळे आपल्या जिल्ह्याने कोरोना नियंत्रणात ठेवला राज्यात सर्वात चांगले काम आहे, मृत्यू दर हा २.७आहे राज्याच्या तुलनेत हा कमी आहे. परंतु यापुढे कोरोनाने मृत्यू होऊ नये, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि जिल्हा लॉकडाऊन करण्याची पाळी आणू देऊ नका.

- Advertisement -

मास्क न वापरणाऱ्यांवर होणार कारवाई 

कोरोना रोखण्यासाठी आज प्रत्येकाने मास्क वापरण्याची गरज आहे अनेक वेळा आवाहन करूनही जर मास्क वापरत नसतील तर पोलीस दंडात्मक कारवाई करणार ही कारवाई टाळण्यासाठी आणि कोरोना रोखण्यासाठी मास्क वापरून सहकार्य करावे मास्क न वापरल्याने दण्डत्मक कारवाई करताना त्यांना मास्कही दिले जाणार आहे तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यानाही पोलीस मास्क देणार अशी माहिती पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.

सिंधुदुर्गात कडक उपाययोजना

कोरोना वाढता संसर्ग टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  मास्क न वापरणाऱ्यावर आता 200 ऐवजी 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. लोकांनी पुढचे आठ दिवस स्वतःहून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये अन्यथा आठ दिवसानंतर संचार बंदी लागू केली जाईल. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयामधून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कोरोना बाबत जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी व इतर अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.

काय म्हणाले जिल्ह्याचे पालकमंत्री? 

पालकमंत्री उदय सामंत यावेळी बोलतांना म्हणले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असला तरी इतर जिल्ह्यात कोरोना वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अगोदरच उपाययोजना आखल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना रोखण्यासाठी सर्वप्रथम मास्क वापरणे आवश्यक आहे. मात्र या बाबत जनता गंभीर नसल्याने मास्क न वापरणाऱ्यावर आता 200 ऐवजी 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत लोकांनी स्वतःहून घराबाहेर पडू नये.  ट्रायल बेसवर आठ दिवसासाठी हा जनता कर्फ्यु लावला जाणार आहे.  मात्र लोकांनी स्वतःहून जनताकर्फ्यू न पाळल्यास रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे.


हेही वाचा – Corona Update: कोरोनाचा कहर! सातारा जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

सिंधुदुर्गात प्रवेश करण्यासाठी करावी लागणार कोरोना टेस्ट
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -