“ही संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी धोक्याची सुचना”, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

PDCC Bank Election ncp ajit pawar reaction on Pune Bank election defeated

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात कोरोनाविषयक आढावा बैठक पार पडली. या बैठीकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यातील कोरोना स्थिती, लसीकरण आणि जागतिक स्तरावर वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्याला संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात इशारा दिला आहे. तसेच पुण्यात कोरोनाच्या सर्व परिस्थितीशी लढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी सुरु

आढाव बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, जागतिक स्तरावरची माहिती घेतल्यास जगात दररोज ५ ते ६ लाखांच्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. ही तिसऱ्या लाटेसाठी धोक्याची सूचना आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण काळजी घेतोय. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत पूर्वतयारी केली जात आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या केरळमध्ये पाहायला मिळत आहे.

खासगी रुग्णालयातील लसींचा वापर करणार

दरम्यान खासगी रुग्णालयातील लसींच्या मुदती संपत आल्याने त्या लसी राज्य सरकार घेण्यासाठी तयार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालायात वापराविना पडून असलेल्या लसी मुदत संपण्याचा आत वापरल्या जाणार आहेत. या लसींबदल्यात खासगी रुग्णालयांना फ्रेश लशींचा साठा राज्य सरकारकडून देण्यात येईल.असंही ते म्हणाले.

डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारांचे प्रमाण वाढले

पावसाळ्य़ात डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीवर जिल्हाप्रशासन आणि राज्य सरकारचे लक्ष असून गरज लागल्यास निर्जंतुकीकरण आणि इतर उपाययोजना केल्या जातील.

दुसऱ्या डोस घेणाऱ्यांना प्राधान्य

य़ावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, पुण्यात नव्या व्यक्तीला लसीचा पहिला डोस देण्याऐवजी ज्यांनी पहिला डोस आधीच घेतला आहे. त्यांनात लसी दुसरा डोस देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करु. तसेच राहिलेल्यांचेही लसीकरण पूर्ण करायचे. बिलं कमी करण्याविषयी कारवाई करत आहोत. असेही अजित पवार म्हणाले.

पुण्यातील कोरोनाबाधित आणि मृत्यू दर

कोरोनाबद्दल सांगायट पुणे मनपामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा दर अडीच टक्के आहे. मृत्यूदर २.३ आहे. पिंपरी चिंचवडचा बाधितांचा दर ३.१ आहे. तर मृत्यूदर १.४ टक्के आहे. पुणे ग्रामीण बाधित दर ३. ९ तर मृत्यूदर १.९ टक्के आहे.

पुण्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी

पुण्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. यासाठी टेस्टिंगचा आकडा कमी केलेला नाही. उलट टेस्टिंग वाढवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या मागील चार आठवड्यांपासून कमी होताना दिसतेय. आत्ता आपल्या भागात ८९८ कोविड लसीकरण केंद्र आणि खासगी ४०० केंद्र आहेत पुणे जिल्हा आणि तालुक्यांमध्ये किमान एक तरी ऑक्सिजन प्लॅट तयार करण्याचे काम सुरु आहे. अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात १६ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेलं आहे. याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. फक्त लस उपलब्ध झाली पाहिजे. लस उपलब्ध झाल्यास निश्चित आकडपर्यंत लवकरचं पोहचू, पुणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ७० लाखांचा टप्पा पार केला आहे. अशी माहिती अजित पवार यांनी दिली.