Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात सर्व जिल्ह्यात ऑक्सिजन प्लॅंट उभारणार- विजय...

Corona Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात सर्व जिल्ह्यात ऑक्सिजन प्लॅंट उभारणार- विजय वडेट्टीवार

चंद्रकांत पाटील टीकेने घायाळ

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. राज्यात दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. लिक्विड मेडिकल ऑक्सीजन स्टोरेज, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लसींच्या साठ्यात वाढ करण्याच्या उपाययोजना राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. जिल्ह्या जिल्ह्यात ऑक्सीजनची निर्मिती करण्यात येत आहे ज्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला राज्य संपुर्ण शक्तिनीशी तोंड द्यायला तयार पाहिजे असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्वीड मेडिकल ऑक्सीजन स्टोरेज म्हणजेच दर महिन्याला २५ हजार ऑक्सीजनचे टेंडर आणि १० लाख रेमडेसिवीरचे टेंडर काढण्यात आले आहे. हे टेंडर काढण्यामागचा उद्देश आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामाना करण्यासाठी राज्याने संपुर्ण शक्तिनीशी तोंड दिले पाहिजे. तसेच ऑक्सजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होऊ नये. राज्यात ऑक्सीजन निर्मिती करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी ८०० कोटी रुपये खर्च करुन हवेतून ऑक्सीजन निर्मिती करण्याची उपाययोजना केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सीजन निर्मिती करण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील टीकेने घायाळ

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांनी भुजबळांना सुचक इशारा दिला होता. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केल्याने चंद्रकांत पाटील यांनी जास्त बोलू नका जामिनावर बाहेर आला आहात असा सूचक इशारा दिला होता. यावर वडेट्टीवार यांनी वक्तव्य केले आहे. टीका करण्याची जर तुमच्यात आवड असले तर टीका सहन करण्याची क्षमता असली पाहिजे. तुम्ही टीका करणार जर दुसऱ्यांनी केल्या तर त्या झोंबणार असे चालत नाही. विशेष करुन निवडणूकीमध्ये जय, पराजय होत असतो पण पाटलांच्या एवढे जिव्हारी लागेल. त्यांचे ह्रदय घायाळ, ह्रदय घायाळ होऊन त्यांच्यात बाण शीरतील त्यांना त्रास होईल असे वाटले नव्हते. चंद्रकांत पाटील शांत माणुस पण त्यांना फार त्रास झाला. ममता बॅनर्जींचा विजय, कोरोना पसरवून मोदीजींनी निवडणूक घेतली. या निवडणूका २ टप्प्यातही घेता आल्या असता आणि देशात लॉकडाउन केला असता तर कोरोनाचे भयान संकट पसरले नसते. याला सर्व केंद्र सरकार जबाबदार आहे. ज्या गर्जना केल्या त्या फुसक्या निघाल्यावर टीका झाल्यामुळे माणुस घायाळ होतो आणि सगळ्यांना चावत सुटतो असा प्रकार दिसत असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -