घरदेश-विदेशकरोनाचा भारतात शिरकाव!

करोनाचा भारतात शिरकाव!

Subscribe

२८ जणांना लागण , युद्धपातळीवर उपाययोजना सुरू

जगभर पसरलेल्या करोना विषाणूने भारतातही प्रवेश केला आहे. देशात करोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या 28 वर पोहचली आहे. दिल्लीतील व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेच आग्र्यातील सहाजणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे सहाजण त्या व्यक्तीचे नातेवाईक आहेत. इटलीमधून भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील 16 जण करोनाग्रस्त आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेला आणि त्यांच्यासोबत असलेला एक भारतीय चालकही करोनाबाधित आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी बुधवारी वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली आणि करोनाचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. सध्या करोना विषाणूच्या तपासणीसाठी 15 प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. आणखी 19 प्रयोगशाळांची निर्मिती सरकारकडून केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

- Advertisement -

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, भारतात तीन हजारांपेक्षा जास्त चाचणी झाल्या आहेत. 15 चाचणी प्रयोगशाळा आधीच बनवण्यात आल्या होत्या. आणखी 19 बनवण्यात आल्या आहेत, तर आठ प्रयोगशाळा मंगळवारपासून सुरु झाल्या असून काही लवकरच सुरु होतील. करोना विषाणूंचे रुग्ण जेथून समोर आले आहेत तेथे तिथल्या तीन किलोमीटरच्या परिसरात प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क करण्याची गरज आहे. दिल्लीच्या रुग्णानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण 66 जणांची आरोग्यतपसाणी सुरू करण्यात आल्याचे हर्षवर्धन म्हणाले.

रुग्णालयांना स्वतंत्र वॉर्ड बनवण्याचा आदेश
देशातील सर्व रुग्णालयांमध्ये चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड तातडीने बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश याआधीही रुग्णालयांना देण्यात आला होता. सहसचिव स्तराच्या अधिकार्‍यांनी अनेक रुग्णालयांना भेट दिली आणि त्यांनी तिथे स्थापन केलेल्या सुविधांचा आढावाही घेतला, अशी माहिती
-डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -