घरताज्या घडामोडीसिंधुदुर्गात कोरोना नियंत्रणात! पॉजिटिव्ह रुग्णसंख्याआली ५० पर्यत खाली

सिंधुदुर्गात कोरोना नियंत्रणात! पॉजिटिव्ह रुग्णसंख्याआली ५० पर्यत खाली

Subscribe

नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करणे आवश्यक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाखांच्यावर कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत . कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या त्याचा चांगला परिणाम दिसून आला असून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे .दररोजची रुग्ण संख्या ५० पर्यत खाली आली आहे चिंताजनक रुग्ण संख्याही कमी झाली आहे . आता परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करून कोरोनामुक्तीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. (Corona under control at Sindhudurg positive patients has come down to 50)

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात ५ लाख ६ हजार १९८ लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये ५० हजार १४८ कोरोना बाधीत रुग्ण आढळलेले आहेत मात्र त्यातील आतापर्यंत ४६ हजार ८४६ कोरोना बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात करीत बरे होऊन घरी परतले आहेत तर १ हजार ३०१ रुग्णांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत १ हजार ९९९ सक्रिय रुग्ण उपचाराखाली आहेत.

- Advertisement -

कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्यामुळे कोरोना बाधीत रुग्णाचा लवकरात लवकर शोध लागून संसर्ग रोखण्यात मदत झाली त्यामुळेच आता कोरोना नियंत्रणात आला आहे दाररोजची कोरोना बाधीत रुग्णसंख्या सहाशे ते सातशे होती ती ५० पर्यत खाली आहे तसेच चिंताजनक रुग्ण संख्याही दररोजची तिनशेच्या वर गेली होती ती आता शंभरच्या खाली आली आहे सद्यस्थितीत ९२ रूग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील ७४ रुग्ण ऑक्सिजनवर तर १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत विशेष म्हणजे व्हेंटिलेटर लावावा लागणाऱ्या रूग्णांची संख्या बरीच कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे पूर्वी ४० ते ५० रुग्ण दररोज व्हेंटिलेटरवर उपचारासाठी असायचे ती संख्या कमी झाली आहे अर्थात बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे.

मृत्यूचे प्रमाणही कमी होत असून बुधवारी दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे मृत्यचे हे प्रमाण रोखण्यासाठी वेळीच उपचारासाठी रुग्णांनी येणे आवश्यक आहे तसेच कोरोना नियंत्रणात आला असला तरी नागरिकांनी मास्क वापरणे,सोशल डीस्टन्स पाळने,हात धुणे या त्रिसूत्रीचा अंमल करून कोविडच्या नियमांचे पालन करून कोरोना मुक्तीसाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण २ वर, दीड वर्षात सर्वात कमी मृत्यू दर

सिंधुदुर्गात कोरोना नियंत्रणात! पॉजिटिव्ह रुग्णसंख्याआली ५० पर्यत खाली
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -