Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona: अकोल्यात कोरोनाचा कहर; १५४ नव्या रुग्णांमध्ये वाढ, पुन्हा 'हे' कडक निर्बंध...

Corona: अकोल्यात कोरोनाचा कहर; १५४ नव्या रुग्णांमध्ये वाढ, पुन्हा ‘हे’ कडक निर्बंध लागू!

अकोला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ६५९वर पोहोचली.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाची परिस्थितीत आटोक्यात येत असतानाच काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढ असल्याचे समोर आले आहे. विदर्भात कोरोनाचा पुन्हा एकदा कहर सुरू झाला आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान १६ जानेवारी म्हणजेच आज झालेल्या आरटीपीआर चाचण्यांमध्ये आणखीन १५४ जणांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ६५९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३४४ जणांचा मृत्यू झाला असून ११ हजार १९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १ हजार १२५ जणांवर उपचार सुरू आहेत.

आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून आरटीपीसीआर चाचण्यांचे ४८५ अहवाल आले. या आलेल्या अहवालांपैकी १५४ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्यााचे समोर आले. तर उर्वरित ३३१ जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आले. सध्या अकोला जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ असल्यामुळे शाळा, कॉलेज बंद करण्यात आल्या आहेत. तसेच धार्मिक, राजकीय कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. शिवाय लग्न सोहळ्याला फक्त ५० व्यक्तींना उपस्थितीत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत अकोल्या जिल्ह्यात ही कडक निर्बंधाची नियमावली राहणार आहे.

अकोला जिल्ह्यात काय आहे कडक निर्बंध?

  • लग्न सोहळ्याची रात्री १०ची वेळ मर्यादित करण्यात आली.
  • लग्न सोहळ्याला फक्त ५० व्यक्तींनाच परवानगी मिळणार.
  • मास्क आणि सॅनिटायझर हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये बंधनकारक.
  • मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग न ठेवणाऱ्या प्रतिष्ठानावार होणार दंडात्मक कारवाई.
  • इयत्ता ५ वी ते ९ वीपर्यंतची शाळा बंद.
  • सर्व कॉलेज सुद्धा बंद.
  • ग्रामीण आणि शहरी भागात जमावबंदी लागू.
  • मिरवणूक आणि रॅली काढण्यास प्रतिबंध.
  • धार्मिक स्वरुपाच्या कार्यक्रमांना फक्त ५० लोकांचा परवानगी.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना दुर्लक्षाची मोठी किंमत चुकवावी लागेल


 

- Advertisement -