Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Update: केंद्रीय पथकं Action मोडमध्ये! मुंबईसह राज्यातील 'हे' जिल्हे रडारवर

Corona Update: केंद्रीय पथकं Action मोडमध्ये! मुंबईसह राज्यातील ‘हे’ जिल्हे रडारवर

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः कहर केला आहे. कोरोनाच्या संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दिवसाला ५० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची गंभीर परिस्थिती पाहता केंद्रीय आरोग्य पथकं Action मोडमध्ये आले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. त्यामुळे आजपासून केंद्राची ३० पथकं महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

महाराष्ट्रातील बिकट होणारी परिस्थिती पाहण्यासाठी केंद्र सतर्क झाले आहे. केंद्राय आरोग्य मंत्रालयाने तज्ज्ञांची पथक महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पाठवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार केंद्रीय आरोग्य विभागाची ३० पथकं आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर करणार आहेत. ही ३० पथकं महाराष्ट्रातील कोरोना प्रभावित असलेली शहर आणि जिल्ह्यांची पाहणी करणार आहेत. तसेच प्रशासनाच्या कोरोना हाताळण्यावर लक्ष ठेवणार आहेत.

‘या’ शहरांसह जिल्ह्यात केंद्राची पथकं दौरा करणार 

- Advertisement -

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, अहमदनगर, बुलढाणासोबत नंदुरबार, सोलापूर, रायगड, लातूर, जालना, धुळे, यवतमाळ, बीड, पालघर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि सांगली आणि उस्मानाबाद या ठिकाणी केंद्राची पथकं दौरा करणार आहेत. यादरम्यान या ठिकाणातील कोरोनाची परिस्थिती काय आहे? याचा सविस्तर आढावा घेतला आहे. तसेच महाराष्ट्रात जो कोरोना लसीचा तुटवडा भासत आहे, त्याबाबत केंद्राच्या पथकांशी चर्चा केली जाईल आणि त्यासंदर्भातला अहवाल केंद्राला सादर केला जाईल.

दरम्यान देशातील महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब या राज्यात केंद्रीय आरोग्य विभागाची ५० पथकं पाहणी करणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात ३० पथकं, छत्तीसगडमध्ये ११ जिल्ह्यांत आणि पंजाबमधील ०९ जिल्ह्यांत कोरोना परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांवर बारकाईने लक्ष ठेवून राज्यातील आरोग्य यंत्रणांना कोरोनाला रोखण्यासाठी मदत करणार आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Corona Update: कोरोनाचा पुन्हा उद्रेक! राज्यात ५९,९०७ नवे रुग्ण


 

- Advertisement -