घरमहाराष्ट्रकोरोना काळात रुग्णांवर औषधांचा अतिरेक नको

कोरोना काळात रुग्णांवर औषधांचा अतिरेक नको

Subscribe

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे डॉक्टरांना आवाहन

लोकांना कोरोनाच्या काळात औषधांचा अतिरेक वापर करू नका. रोगापेक्षा इलाज भयंकर असे होता कामा नये. पावसाळ्यात अधिक खबरदारी घ्यावी लागले. कारण म्युकरमायकोसीसप्रमाणे पावसाळा सुरू झाल्यावर इतर बॅक्टेरिया येणार, व्हायरस येणार. त्यामुळे अशा रुग्णांवर उपचार करताना सावधगिरी बाळगायला हवी, हे लक्षात घेऊन उपचार पद्धती अवलंबावी, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी मुख्यमंत्री यांनी व्हिसीच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधला.

अनावश्यक असूनही काही रुग्ण हॉस्पिटलमध्ये जातात आणि काही वेळेला आवश्यक असून रुग्ण हॉस्पिटलमध्ये उशिरा दाखल होतात. यामुळे रुग्ण दगावतो. ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशा प्रकारचे आहे. तुम्हाला हेच ओळखता आले पाहिजे. अनावश्यकपणे औषधांचा अतिरेक वापर केला जातोय, ही एक मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे डॉक्टरांनी आणि लोकांनी कोविडच्या काळात औषधांचा अतिरेक वापर करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

- Advertisement -

ते म्हणाले, म्युकरमायकोसीसच्या रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले असताना जास्त काळासाठी स्टिरॉईड देणे आणि इतर काही औषध देणे, हे टाळले गेले पाहिजे. म्हणजेच ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ या गोष्टी होता कामा नये. काही जण आजार घरी अंगावर काढत आहेत. तर ते करू नका. रुग्णाला कोविड झाल्याचे वेळेत सांगणे गरजेचे आहे. तुला कोरोना झालेला आहे, जर तुला घरी राहणे शक्य असेल तर वेगळा राहा. माझ्या गाईडलाईन प्रमाणे औषधे घे. नाहीतर तू तुझा कोविड कुटुंबियांना देऊ शकतो, असे त्यांना पटवून द्या, असे उध्दव म्हणाले.

म्युकरमायकोसीसप्रमाणे पावसाळा सुरू झाल्यावर इतर बॅक्टेरिया येणार, व्हायरस येणार याच्यावर उपचार करताना काय सावधगिरी बाळगायला हवी हे तुम्ही लक्षात घेऊन उपचार पद्धती अवलंबावी लागणार आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले, आतापर्यंत आपण पाहतोय की, जी व्यक्ती सहव्याधी आहे, त्याच्यावर विषाणूचा घातक परिणाम होतो, हे लक्षात घेऊन कोरोनावरील औषध येत आहेत. काही येऊ घातली आहेत, काही आली आहेत. कोविडचा रुग्ण वेळेत ओळखला पाहिजे, त्याच्यापासून त्याचे कुटुंब वाचवले पाहिजे. कोरोनाचा प्रसार त्याच्या कुटुंबियांना होता कामा नये. दुसर्‍या लाटेत तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात संसर्ग दिसतोय तर तिसर्‍या लाटेत बालके संसर्गग्रस्त होऊ शकतात असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यादृष्टीने अधिक सावधानता बाळगली पाहिजे असे म्हटले.

- Advertisement -

‘माझा डॉक्टर’ म्हणून रुग्णांचा विश्वास
आपण ‘माझा डॉक्टर’ या संकल्पनेतून सातत्याने राज्यभरातील डॉक्टरांशी संवाद साधत आहोत. मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वसामान्य रुग्ण पहिल्यांदा त्याला कोणताही त्रास झाला की आपल्या फॅमिली डॉक्टरकडे तपासणीसाठी जातो, हे लक्षात घेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. कोविडची लक्षणे फसवी आहेत. बहुतांश जणांना लक्षणेही दिसत नाहीत. अशा वेळी तुमच्यावर योग्य रीतीने अशा रुग्णास ओळखण्याची जबाबदारी आहे. विशेषत: प्राथमिक आणि मध्यम अवस्थेतील आणि ज्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, असा रुग्ण घरीच व्यवस्थित उपचार घेत आहे किंवा नाही ते आपण पाहिले पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -