Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र होम क्वारंटाईनच्या नियमांची अंमलबजावणी करा; एकनाथ शिंदेंचे निर्देश

होम क्वारंटाईनच्या नियमांची अंमलबजावणी करा; एकनाथ शिंदेंचे निर्देश

रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे वाढीव बेड्सचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच रुग्णालयात दाखल होण्याऐवजी होम क्वारंटाईन होण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. मात्र, होम क्वारंटाइनचे काटेकोर पालन होत नसल्यामुळे कोरोनाचा वेगाने प्रसार होत असून होम क्वारंटाईनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन रुग्णांकडून होईल, याची दक्षता स्थानिक प्रशासनाने घ्यावी. तसेच कोरोना चाचण्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, असे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपरिषदांना दिले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पुढील दोन दिवस राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, तसेच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची बैठक बोलावली असून आज (सोमवार) अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागातील महापालिका, तसेच नगर परिषदांची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाली.

- Advertisement -

त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतानाच त्यांच्या अडचणीही एकनाथ शिंदे आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी समजून घेतल्या. होम क्वारंटाईन रुग्णांचे ट्रॅकिंग करण्यासाठी कॉल सेंटर सुरू करून रुग्णांचे नियमित ट्रॅकिंग करण्याचे आदेश त्यांनी सर्व महापालिका आणि नगरपालिकांना दिले.

रुग्णालये, तसेच कोविड केअर सेंटर येथे कुठल्याही प्रकारची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे वाढीव बेड्सचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर कमी पडणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली.

- Advertisement -

 

- Advertisement -