Corona Update : दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांवर स्थिरावली, मृत्यूदर १.८४ टक्क्यांवर

राज्यात सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी ३६५ बाधित हे मुंबईतील असून ४७३ बाधित पुण्यातील आहे. तर, आतापर्यंत राज्यात ८० लाख १४ हजार ८२३ लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील १६ हजार जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. 

corona omicron and its 9 sub types driving coronavirus surge in delhi

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा (Corona infection) आकडा दोन हजारच्या घरात आहे. आजही शुक्रवारी गेल्या २४ तासांत २३७१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २९१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. (Corona update from maharashtra)

हेही वाचा – आजपासून देशात मोफत बुस्टर डोस देण्यास सुरुवात, सर्व प्रौढांना 75 दिवसांत मिळणार लस

राज्यात आतापर्यंत ७८,५०,८०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ९७.९५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर आज राज्यात १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने राज्यातील मृत्यूदर (Death Rate) १.८४ टक्के आहे.

राज्यात सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी ३६५ बाधित हे मुंबईतील असून ४७३ बाधित पुण्यातील आहे. तर, आतापर्यंत राज्यात ८० लाख १४ हजार ८२३ लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील १६ हजार जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

सक्रीय रुग्ण

मुंबई – २६४०

ठाणे – १४४५

पुणे – ५८७६

जळगाव, नंदूरबर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 100 पेक्षा कमी आहे.

हेही वाचा – केंद्राचा मोठा निर्णय; 6 महिन्यांनी घेता येणार लसीचा Precaution Dose