राज्यात आजही दोन हजारांवर नवे कोरोनाबाधित, पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यात सध्या १४ हजार ७८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी मुंबईत २०९३ रुग्ण असून पुण्यात ५४१३ रुग्ण सक्रीय आहेत. 

corona omicron and its 9 sub types driving coronavirus surge in delhi

राज्यात सोमवारी १ हजार १११ नवे कोरोना रुग्ण (New Corona Patients in Maharashtra) सापडले होते. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आज मंगळवारी पुन्हा दोन हजाराच्या घरात नव्या रुग्णांची संख्या गेल्याने राज्यावरील दिलासा कमी झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आज दिवसभरात २ हजार २७९ नवे बाधित सापडले असून २ हजार ६४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. (Corona update from Maharashtra)

हेही वाचा – नागपुरच्या खासगी शाळेत तब्बल 38 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

सोमवारी दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र, आज सहा जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. आज २ हजार ६४६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ५९ हजार ९६० आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.९७ टक्के आहे.

राज्यात सध्या १४ हजार ७८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी मुंबईत २०९३ रुग्ण असून पुण्यात ५४१३ रुग्ण सक्रीय आहेत.

हेही वाचा – भारतामध्ये दीड वर्षांत कोरोना लसीकरणाचा २०० कोटींचा टप्पा पार, प्रौंढांना बुस्टर डोस देण्यास सुरुवात

देशभरात बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिक अनुत्सुक असल्याचं दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारतर्फे कोविड लस अमृत महोत्सव सुरू करण्यात आला आहे. पुढचे ७५ दिवस सर्व महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर ३० सप्टेंबरपर्यंत मोफत बुस्टर डोस देण्यात येणार आहे.