कोरोनामुळे राज्यात आज १३ जणांचा मृत्यू, नव्या बाधितांची संख्या दोन हजारांवर

आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.९३ टक्के आहे तर, मृत्यूदर १.८४ टक्के आहे.

corona

राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ४३५ नव्या कोरोना रुग्णांची (New Corona patients in Maharashtra) नोंद झाली आहे. तर, २ हजार ८८२ रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. तसेच, १३ कोरोनाबाधितांचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.९३ टक्के आहे तर, मृत्यूदर १.८४ टक्के आहे. (Corona Update from maharashtra, death rate increases)

हेही वाचा – देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

दरम्यान, आज सापडलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या ३ हजार ३१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, संपूर्ण राज्यभरात १७ हजार ५६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, ठाण्यात १९४७ सक्रीय रुग्ण आहेत.

हेही वाचा उद्धव ठाकरे यांचा एकला चलो रेचा नारा; २०२४ च्या विधानसभा निवडणूक तयारीला लागण्याचे आदेश

राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंचही सापडला आहे. आज बी ए.5 व्हेरीयंटचे आणि बी ए. 4 व्हेरीयंटचे सहा रुग्ण तर बी ए. 2.75 चे तीन रुग्ण आढळले आहेत. पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि सोलापूरमधील हे रुग्ण आहेत. या रुग्णांना कोणतेही लक्षण नसून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.