घरCORONA UPDATEवैद्यकीय ऑक्सिजन उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना जीएसटीत सवलत; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना जीएसटीत सवलत; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Subscribe

महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना नोंदणी शुल्क, विद्युत शुल्क, जीएसटी आदींमध्ये सवलत देण्यात येणार आहे. येत्या चार-पाच महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता सद्य:स्थितीत १ हजार ३०० मे. टन/प्रतिदिन असताना १ हजार ८०० मे.टन इतक्या ऑक्सिजनची मागणी आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ही मागणी २ हजार ३०० मे.टन इतकी वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने तातडीने ऑक्सिजन निर्मिती आणि साठा वाढविणे, क्रिटीकल गॅप शोधून कार्यवाही करणे, लॉजिस्टीक ट्रान्सपोर्टवर उपाययोजना करणे आदी उपाययोजना करून राज्य ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी, तसेच आवश्यक ऑक्सिजन निर्मितीचे उदिष्ट साध्य करण्यासाठी उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी प्रदान केलेल्या मौजे बालेवाडी येथील जागेसंदर्भातील शासन ज्ञापनातील अटी शिथील करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा मेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी सहभागाने “संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरीत करा” या तत्वावर विकसित करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -