यंदा पालखी सोहळा कोरोना निर्बंधमुक्त असणार – अजित पवार
राज्यात १४९४ कोरोनाबाधितांची नोंद
देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण
घोडेबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी – किरीट सोमय्या
घोडेबाजार नेमको कोण करतंय याचे मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे – सोमय्या
कश्मीरी पंडितांच्या हत्येवरून राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा – राऊत
अयोध्या दौरा हा धार्मिक, शक्तीप्रदर्शन नाही – राऊत
काश्मिर पुन्हा जळतेय – राऊत
महाविकास आघाडी हे बाळासाहेंबांचे स्वप्न – आदित्य ठाकरे
१५ जूनला आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर – आदित्य ठाकरे
मध्य हार्बरसर, मुंबईतील रेल्वेच्या पश्चिम मार्गावरही आज मेगा ब्लॉग
तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या काही कामांसाठी आज हार्बर आणि मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.
नियोजित थांबे घेऊन आपल्या ठरलेल्या स्थानकावर पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील.
सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.
नियोजित थांबे घेऊन आपल्या ठरलेल्या स्थानकावर पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील.
सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेलबेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील.
ब्लॉक कालावधीमध्ये ठाणे वाशी, नेरूळ दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू राहतील.
बेलापूर नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय सेवा सुरू राहतील.
पश्चिम रेल्वेमार्गावर पोईसर येथील पुलाच्या कामासाठी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येतोय.
शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून हा ब्लॉक सुरु करण्यात आला.
रविवारी 1.30 वाजेपर्यंत हा जम्बो ब्लॉक असेल.
या काळात बोरीवली ते गोरेगाव दरम्यान, धावणाऱ्या सर्व फास्ट लोकल या स्लो ट्रॅकवरुन चालवण्यात येतील.