घरमहाराष्ट्रCorona Update : बाजार समितीच्या आवारात कोरोना केंद्र सुरु करण्यास परवानगी -...

Corona Update : बाजार समितीच्या आवारात कोरोना केंद्र सुरु करण्यास परवानगी – बाळासाहेब पाटील

Subscribe

कोरोना काळजी केंद्र हे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करण्यात यावे, अशा सुचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोरोना काळजी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी दिली. या केंद्रात कोरोना उपचाराशी निगडीत विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन सेंटर, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड, सॅच्युरेटेड, ऑक्सिजन मशीनचा पुरवठा आदी सुविधा उपलब्ध असणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. कोरोना काळजी केंद्र हे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करण्यात यावे, अशा सुचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मागील वर्षाच्या वाढाव्याच्या २५ टक्के रक्कमेच्या मर्यादेत कोरोना काळजी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी १० लाखापर्यंतच्या भांडवली खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले असून १० लाखांच्या वरील प्रस्ताव प्राप्त झाल्यास अशा प्रस्तावाच्या भांडवली खर्चास मान्यता देण्याचे अधिकार पणन संचालकांना देण्यात आल्याचे बाळासाहेब पाटील म्हणाले.

- Advertisement -

कोरोना काळजी केंद्र हे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करण्यात यावे. या केंद्राच्या विलगीकरण कक्षात बाजार समितीकडून ऑक्सिजनसह बेड सुविधा उपलब्ध करून देणे, सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशीनचा पुरवठा करण्यात यावा. तसेच सेंटरवरील विलगीकरण कक्षात येणाऱ्या रूग्णांना बाजार समितीने दोन वेळचे जेवण, नाश्ता आणि चहा यांची प्रामुख्याने व्यवस्था करावी, अशी सूचना देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -