कोरोनाचा विळखा कायम! पुण्यात एका रात्रीत २०५ नवे रूग्ण!

women has been arrested in a viral audio clip in the name of MLA Geeta Jain
बापरे! केंद्राकडून एका कोरोनाबाधित रुग्णामागे मिळतायत दीड लाख रुपये? जाणून घ्या सत्य

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार ३६९ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २४६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख २७ हजार ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यासह मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. पुण्यात गेल्या २४ तासात २०५ नवे रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधीतांचा आकडा ५६ हजाराच्या वर गेला आहे.

तर पुण्यात मंगळवारी १ हजार ५१२ नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. आणि एकूण ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, १ हजार ५१२ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४० हजार ७१५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ८०५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ६१६ रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर सध्या १५ हजार ४३४ सक्रिय रुग्ण आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६१६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ९९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ५१७ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. दिवसभरात ३० जणांचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १,०३५ झाली आहे. दिवसभरात एकूण ८०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण संख्या २२ हजार २४६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १५ हजार ४३४ झाली आहे.


हे ही वाचा – ४ रूग्णालयांनी नाकारल्यामुळे महिलेचा मृत्यू, किरीट सोमय्यांनी प्रशासनावर उपस्थित केला प्रश्न!