घरदेश-विदेशCorona Update : महाराष्ट्रासह देशभरात रुग्णांची संख्या पुन्हा वाढली, सक्रिय रुग्ण १०...

Corona Update : महाराष्ट्रासह देशभरात रुग्णांची संख्या पुन्हा वाढली, सक्रिय रुग्ण १० हजार पार

Subscribe

Corona Update in India | देशात सध्या १०,३०० रुग्णांवर उपचार सुरू असून ९३२ रुग्ण गेल्या २४ तासांत कोरोनातून बरी झाली आहेत. तर, देशभरात एकूण ४ रुग्णांच्या मृतांची नोंद करण्यात आली आहे.

Corona Update in India | नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून वेग मंदावलेल्या कोरोनाने आता पुन्हा एकदा संसर्गाचा वेग वाढवला आहे. गेल्या २४ तासांत देशात १,८०५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतात सक्रिय रुग्णांचा आकडा १० हजारांच्याही पुढे गेला आहे. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ असल्याचं बोललं जात आहे.

देशात सध्या १०,३०० रुग्णांवर उपचार सुरू असून ९३२ रुग्ण गेल्या २४ तासांत कोरोनातून बरी झाली आहेत. तर, देशभरात एकूण ४ रुग्णांच्या मृतांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात (Corona Update in Maharashtra) गेल्या २४ तासांत ३९७ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात सध्या २११७ रुग्णांवर उपचार (Active Corona Patients) सुरू आहेत. तर, गेल्या २४ तासांत २३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी ४३७ रुग्णांची नोंद झाली होती. तर, महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये २४ तासांत ३०३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १६९७ सक्रीय रुग्ण आहेत. तर, एकाच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे.

हेही वाचा – टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि लसीकरण : कोरोनाच्या बचावासाठी केंद्राकडून चतुःसूत्री जाहीर

- Advertisement -

मुंबईतील आकडेवारी काय सांगते?

मुंबईत गेल्या २४ तासांत १२३ नव्या रुग्णांची वाढ झाल्याने सक्रीय रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली आहे. ४३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क केल्या आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयात १८०५०, कस्तुरबा रुग्णालयात ३०, खाटा उपलब्ध असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. रुग्णांची वाढ झाल्यास खाटांची संख्याही वाढवण्यात येईल, असंही पालिकेकडून सांगण्यात आले आहे. तर, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे.

हेही वाचा राजस्थानमध्ये राईट टू हेल्थ लागू; देशभरातील डॉक्टरांचा संताप

देशभरात मॉकड्रील होणार

कोरोनाचा आलेख पुनश्च वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांसोबत मॉक ड्रीलसंदर्भात बैठक आयोजित केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड-१९ चा आढावा घेण्यात येणार आहेत. तर, १० आणि ११ एप्रिल रोजी देशव्यापी मॉक ड्रिलचेही आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -