घरताज्या घडामोडीभारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता कमी

भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता कमी

Subscribe

विषाणूतज्ज्ञ डॉ. जेकब जॉन यांचा अंदाज

भारतीयांना कोरोना विषाणूसह जगणे शक्य होत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले असताना भारतात आताच्या स्थितीत कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी असल्याचा अंदाज आयसीएमआरच्या सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्सड् रिसर्च इन व्हायरॉलॉजीचे माजी प्रमुख आणि सुप्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ डॉ. टी. जेकब जॉन यांनी व्यक्त केला आहे.

जगभरात कोरोनाचा कहर आता कमी होत आहे. अनेक देशांमध्ये जनजीवन सामान्य झाले आहे. त्यातही भारतीयांनी कोरोना विषाणूसोबत जगणे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी सांगितले. मे ते जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या आयसीएमआरच्या देशव्यापी चौथ्या सिरो सर्वेक्षणात 67 टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटीबॉडीज असल्याचे आढळून आले. मात्र, हे प्रमाण सगळीकडे सारखे नव्हते. म्हणजे बिहारमध्ये 79 टक्के सिरोपॉझिटिव्हिटी आढळून आली तर केरळमध्ये फक्त 44 टक्के. त्यानंतरही मोठ्या संख्येने अनेकांना लागण होत होती. कोरोनाबाधितांचे आकडे वाढत होते. त्यामुळे अर्थातच लागण होऊन बरे झालेल्यांमध्ये कोरोना अँटीबॉडीज वाढल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आणखी एक सर्वेक्षण घेतले जाणार आहे.

- Advertisement -

या सिरो सर्वेक्षणात जर 75 टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटीबॉडीज आढळून आल्या तर त्यामुळे काय भाकित वर्तवता येईल. ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांच्या मते कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे, जो आतापर्यंत सर्वाधिक प्रसार करणारा समजला गेला आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही हे स्पष्टच आहे. कारण डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव भारतापुरता तरी बराच कमी झाला आहे.

आयसीएमआरच्या या सिरो सर्वेक्षणावरून विषाणूतज्ज्ञ डॉ. जेकब यांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारतातील कोरोना विषाणू आता कमकुवत झाला आहे. तसेच भारतीय आता कोरोनासोबत जगायला शिकले असल्याचे सांगितले.

- Advertisement -

तसेच देशातील अनेक साथरोग आणि विषाणू तज्ज्ञांच्या मते देशातील 86 टक्के नागरिकांमध्ये असलेले अँटीबॉडीजचे प्रमाण हर्ड इम्युनिटी किंवा सामूहिक प्रतिकारक्षमता तयार होण्यासाठी पुरेसे आहे. अगदी डेल्टा व्हेरिअंटसारख्या वेगाने पसरणार्‍या विषाणूला थोपवण्यासाठी हे प्रमाण उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. मात्र, याचा अर्थ कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकलीय असा काढू नये, असा इशाराही हे शास्त्रज्ञ देत आहेत. डेल्टा किंवा डेल्टा प्लस व्हेरियंटपेक्षाही अधिक भीषण व्हेरियंट भविष्यात तयार होण्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -