Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination : आदित्य ठाकरेंनी डिलीट केलेल्या ट्विटरवर भाजपचा निशाणा

Corona Vaccination : आदित्य ठाकरेंनी डिलीट केलेल्या ट्विटरवर भाजपचा निशाणा

मोफत लसीकरणाची योजना राज्य सरकार कधी राबवणार याबाबत सविस्तर माहिती द्यावी.

Related Story

- Advertisement -

राज्यात १८ वर्षांवरी नागरिकांच्या लसीकरणावरुन राज्य सरकारमध्ये वाद सुरु आहे. राष्ट्रावादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. परंतु पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी असा निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे. तर उपमुख्यमंत्र्यांनी अजून त्याबाबत निर्णय घेऊ असे म्हटले आहे. यामुळे राज्य सरकारमध्येच गोंधळ असल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. गोंधळात गोंधळ हेच राज्य सरकारचे वैशिष्ट्ये आहे. असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे. राज्य सरकारने मोफत लसीकरण करण्याबाबत निर्णय घ्यावा आणि लसीकरण मोहिम राबवावी अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रामधल्या सरकारच्या घटक पक्षांनी १८ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणावरुन जो गोंधळ आणि श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायतं त्याच्यामुळेच कोणाचीही मान शर्मेने खाली जाईल अशा प्रकारचा किळसवाणा प्रकार सुरु आहे. १८ वर्षांवरील सर्व लोकांना कोरोना लस मोफत द्यावी अशी पहिल्यापासून भाजपची मागणी होती राज्य सरकारने या संदर्भातला निर्णय त्वरित जाहीर करावा, एकिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात निर्णय घेऊ, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणतात निर्णय घेतला आहे. युवराज ट्विट करतात आणि डिलीट करतात त्यामुळे गोंधळात गोंधळ या राज्य सरकारचे वैशिष्ट्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या संदर्भातली मोफत लसीकरणाची योजना राज्य सरकार कधी राबवणार याबाबत सविस्तर माहिती राज्य सरकारने देऊन येत्या १ मे पासून ही लसीकरण मोहिम राबवावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेत्यानेच राष्ट्रवादीला फटकारले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाबाबत केलेल्या घोषणेनंतर राज्य सरकारमध्ये नाराजी दिसत आहे. यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत राष्ट्रवादीला फटकारले आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे. परंतु मोफत लसीकरणाची घोषणा एकट्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. थोडं वेगळे वाटले. मोफत लसीकरणाचा निर्णय योग्य आहे. परंतु याबाबतची घोषणा मुख्यमंत्री करणार की राज्य सरकारमधील एक पक्ष? या महामारीत श्रेय घेण्याचे राजकारण वाईट आहे. राष्ट्रवादीने असे प्रकार करु नये असे खोचक ट्विट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले आहे. तसेच अभी जरा बाज आएँ अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.

- Advertisement -