घरताज्या घडामोडीCorona Vaccination: आश्वासन ४० हजाराचे मिळाले मात्र २६ हजार, रेमडेसिवीर कोट्याबाबत राजेंद्र...

Corona Vaccination: आश्वासन ४० हजाराचे मिळाले मात्र २६ हजार, रेमडेसिवीर कोट्याबाबत राजेंद्र शिंगणेंचे केंद्राला पत्र

Subscribe

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे केंद्राला पत्र

केंद्र सरकारने राज्य सरकारला प्रतिदिन ४० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचे मान्य केले होते. पण, प्रत्यक्षात दररोज २६ हजार दिली जात असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सोमवारी दिली. यासंदर्भात आपण केंद्र सरकारला पत्र लिहिल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने २१ ते ३० एप्रिलपर्यंत राज्याला १ लाख २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ केले होते. मात्र राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोटा वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्राला ४ लाख ३५ हजार रेमडेसीवीरचा कोटा निर्धारित केला गेला.

वाढवलेल्या कोट्यानुसार राज्याला २१ ते ३० एप्रिल दरम्यान दर दिवशी ४० हजार रेमडेसीवीर इंजेक्शन देणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात फक्त २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत आहेत, असे डॉ. शिंगणे यांनी सांगितले. मे महिन्यात राज्यात कोरोनाची दुसरी लाट परमोच्च बिंदूवर जाईल,असा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे रेमडेसिवीरची मागणी पुन्हा वाढणार आहे. त्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ६१ कोटी रुपयांच्या औषध खरेदीस प्रशासकीय मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सरकारची औषध खरेदी हाफकीन जैव मंडळ संस्थेमार्फत होणार आहे. त्यामध्ये रेमडेसिवीरच्या ६ लाख ६० हजार कुप्या असून एक कुपी ७०० रुपयांना खरेदी केली जाईल. राज्य सरकार खरेदी करत असलेल्या रेमडेसिवीरची किंमत ४६ काेटी २० लाख रुपये असल्याची माहिती डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -