घरदेश-विदेशCorona Vaccination : इतर देशांच्या तुलनेत भारत पिछाडीवर

Corona Vaccination : इतर देशांच्या तुलनेत भारत पिछाडीवर

Subscribe

लोकसंख्या १३८ कोटी, लसीकरण १ कोटी ६५ लाख नागरिकांचे, १०० दिवसात केवळ सव्वा टक्के नागरिकांना लस

भारतात कोरोनाची दुसरी लाट आहे. ही लाट इतकी भयंकर आहे की, रुग्ण रोजच्या रोज मोठ्या संख्येने मिळत आहेत. कोरोना मृतांची संख्या वाढतेय. ही लाट आटोक्यात येण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ जास्तीतजास्त लसीकरणाचा उपाय अगत्याने सांगत आहेत. मात्र, जगातील काही देशांची तुलना केल्यास भारतातील आतापर्यंत झालेले लसीकरण खूपच नगण्यात असल्याचे दिसून येते. भारताची लोकसंख्या १३८ कोटी असताना त्या तुलनेत आतापर्यंत फक्त १ कोटी ६5 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

इंग्लंडमध्ये अ‍ॅस्ट्रा झेनेका, फायझर बायोटेक, जानसेन या कंपन्यांची लस दिली जाते. येथे मे २०२० मध्येच लसीकरणाला सुरुवात झाली. ऑगस्ट २०२०पर्यंत इंग्लंडमध्ये १५ कोटी नागरिकांना लसी देऊन झाली आहे. अमेरिकेत नोवावॅक्स, जानसेन, मॉर्डना, फायझर बायोटेक या कंपन्यांची लस दिली जाते. ऑगस्ट २०२० पर्यंत अमेरिकेत ४० कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. युरोपियन युनियनमध्ये अ‍ॅस्ट्रा झेनेका, फायझर बायोटेक, जानसेन या कंपन्यांच्या लस देण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर २०२० पर्यंत ७०कोटी नागरिकांचे लसीकरण येथे झाले आहे. ऑस्ट्रेलियात अ‍ॅस्ट्रा झेनेका या कंपनीच्या लसीचे सप्टेंबर २०२० पर्यंत ३ कोटी ३८ लाख डोस देण्यात आले आहेत.

- Advertisement -

ब्राझीलमध्ये अ‍ॅस्ट झेनेका कंपनीचे ९ कोटी डोस ऑगस्ट २०२० पर्यंत देण्यात आले आहेत. जर्मनीमध्ये फायझर बायोटेक कंपनीचे ३ कोटी डोस देण्यात आले आहेत. जपानमध्ये फायझर बायोटेक, अ‍ॅस्ट्रा झेनेका, मॉर्डना या कंपनीची लस देण्यात येत असून ऑक्टोबर २०२० पर्यंत २२ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. भारतात सीरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस देण्यात येते. मात्र, भारतात जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत फक्त १ कोटी ६ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

भारत सोडला तर इतर देशांमध्ये लसीकरणाला खूप अगोदर प्रारंभ झाला आहे. भारतात सीरम आणि बायोटेकची लस तयार होण्यास जास्त कालावधी लागल्यामुळे आणि या दोन कंपन्यांच्या लसी आवश्यक त्या प्रमाणात निर्माण होत नसल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची दाहकता वाढण्यात या गोष्टी कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -