घरताज्या घडामोडीलस शेवटचा उपाय नव्हे, कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे चंद्रकांत पाटलांचे आवाहन

लस शेवटचा उपाय नव्हे, कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे चंद्रकांत पाटलांचे आवाहन

Subscribe

राज्यात येत्या १ मे पासून मोफत लसीकरण

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या कोरोना लसीकरणाचा येत्या १ मे पासून तिसरा टप्पा सुरु होणार आहे. राज्य सरकारने या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वर्षापर्यंतच्या नागरिकांना कोरोना लस मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले आहे. तसेच लसीला शेवटचा उपाय न समजता मास्क, सोशल डिस्टंन्सिंगचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या मोफत लसीकरण मोहिमेचे स्वागत केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ५ कोटी ७१ लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, कोरोना संकटाशी सामना करताना केंद्र आणि राज्य सरकारला अशाच प्रकारे एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. जनतेला मी आवाहन करतो की, कोरोनाच्या या लढाईत लसीला शेवटचा उपाय न समजता मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगच्या सर्व नियमांचे पालन करा असे चंद्रकांत पाटील यांनी म्हले आहे. तसेच जय हिंद ! जय महाराष्ट्र ! असे म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यात येत्या १ मे पासून मोफत लसीकरण

राज्यातील १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण मोफत करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत मोफत लसीकरणावर निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ६ महिन्यांत राज्यातील लसीकरण पुर्ण करण्याचे धोरण राज्य सरकारने ठेवले आहे. यासाठी राज्य सरकारला १२ कोटी लसींची गरज लागणार असून एकूण साडे सहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. येत्या १ मे पासून राज्यात लसीकरण सुरु होणार नसून लसींचा साठा केल्यावर विना अडथळा लसीकरण करण्यात येणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -